आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात अटक झालेल्या केतकी चितळेची तुरूंगातून सुटका

१४ मे रोजी पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले होते, १८ मे रोजी केतकी न्यायालयीन कोठडीत होती. केतकी चितळेच्या जामीनाला पोलिस विरोध करत नसल्याचा जबाब नोंदवल्याने बुघवारी न्यायालयाने केतकी चितळेला जामीन मंजूर केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला होता. केतकीला २२ जून रोजी, बुधवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जून २३ रोजी, गुरूवारी तिची तुरूंगातून सुटका झाली होती. यावेळी तुरूंगाबाहेर येताना केतकी हसताना दिसत होती.

मागील काही दिवसांपूर्वी केतकी चितळेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या व्यंगावरून अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती, या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून केतकीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये केतकी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. १४ मे रोजी पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले होते, १८ मे रोजी केतकी न्यायालयीन कोठडीत होती. केतकी चितळेच्या जामीनाला पोलिस विरोध करत नसल्याचा जबाब नोंदवल्याने बुघवारी न्यायालयाने केतकी चितळेला जामीन मंजूर केला.

काय होत नक्की प्रकरण
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेने ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनेच केली होती. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीने आपल्या याचिकेतून केला होता. आता केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे.