KGF 2:अभिनेत्री रवीना टंडनने पोस्ट शेअर करत लिहलं, मॉन्स्टर तेव्हाच येईल जेव्हा..

सिनेमात अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)मुख्य भूमिका साकारणार आहे.

KGF 2: Actress Raveena Tandon shared a post, Monster will come only when ...
KGF 2:अभिनेत्री रवीना टंडनने पोस्ट शेअर करत लिहलं, मॉन्स्टंर तेव्हाच येईल जेव्हा...

बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF: Chapter 2) कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळतेय. आता सिनेमा कधी रिलीज होणार याची घोषणा काही दिवसानंतर करण्यात येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटासंबधीत एक पोस्ट रवीनाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केली आहे. पोस्टवर लिहलं आहे की, मॉन्स्टर तेव्हाच येणार जेव्हा संपुर्ण जागा गँगस्टरने भरलेली असेल. केजीएफ चॅप्टर2 सिनेमाची तारीख लवकरच जाहिर करणार आहोत.याला कॅप्शन देत रवीनाने लिहलं आहे. ” या मॅग्नम ओपसचे (MAGNUM OPUS )सर्वजन साक्षी व्हा” रवीनाच्या या पोस्टमुळे ‘केजीएफ चॅप्टर 2’ सिनेमाच्या चाहत्यांमध्ये प्रंचड उत्सुकता वाढू लागली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार यशने (Yash) हा सिनेमा या पुर्वी 16 जुलैला रिलीज होणार असल्याचे घोषीत केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोकांच्या सुरक्षीततेसाठी तसेच सिनेमाचा भला मोठा फॅनबेस पाहात सिनेमा थेटरमध्येच रिलीज करणार असल्याचे ‘केजीएफ चॅप्टर2’ च्या मेकर्सने ठरवले आहे.परंतू अद्याप सिनेमाबाबत काही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

2018 साली ‘केजीएफ’ सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती. यांनतर पुढिल भाग यापेक्षाही मोठा,भव्य तसेच ॲक्शन,मनोरंजनाचा मसाला सिनेमात असणार आहे. असे अभिनेता यशने चाहत्यांना सांगितले आहे. डायरेक्‍टर प्रशांथ नील यांच्या बॉल्कबस्टर सिनेमात अभिनेता यश आणि रवीना व्यतीरिक्त संजय दत्‍त, प्रकाशा,श्रीनिधि शेट्टी सारख्या कलाकारांची महत्वपुर्ण भूमिका असणार आहेत. केजीएफ सिनेमा हिंदी, कन्‍नड़, तमिल, तेलुगू,मलयालम या भाषेत रिलीज होणार आहे.हे हि वाचा – नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मुलगा विवानने शेअर केला फोटो