बॉक्स ऑफिसवर KGF 2 चा कल्ला; 1000 कोटींची कमाई करणारा जगातील चौथा चित्रपट ठरला

KGF 2 फेम अभिनेता रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर मॉन्स्टर असल्याचे सिद्ध झाले आहे

KGF Chapter 2 Box Office Collection Breaks records entered in 1000 cr club dangal and bahubali
बॉक्स ऑफिसवर KGF 2 चा कल्ला; 1000 कोटींची कमाई करणारा जगातील चौथा चित्रपट ठरला

KGF Chapter 2 Box Office Collection : एकीकडे चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर 20-30 कोटींची कमाई करणे कठीण होत आहे. मात्र दुसरीकडे साऊथ सुपरस्टार यशचा KGF 2 हा चित्रपट नॉनस्टॉप कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करतोय. यशच्या या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात नवा रेकॉर्ड केलाय. KGF 2 च्या हिंदी व्हर्जनने अखेर 350 कोटींचा टप्पा पार केला आहे.

बॉक्स ऑफिसवर KGF 2 ची हवा

इतकेच नाही तर KGF 2 ने 1000 कोटींचा कलेक्शन पार करून जगभरातील बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. KGF 2 ने पुन्हा एकदा जगभरात 1000 कोटी आणि हिंदी भाषेत 350 कोटींची कमाई करून आपली ताकद दाखवली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी KGF 2 च्या हिंदी व्हर्जनचे कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, थिएटरमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही, KGF 2 ची दहशत कायम आहे. कोणताही मोठा रिलीज या चित्रपटाला धक्का देऊ शकला नाही.

रनवे 34 आणि हिरोपंती 2 मधील काटे की टक्कर असतानाही यशच्या चित्रपटाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. याउलट यशच्या चित्रपटाने या दोन्ही चित्रपटांच्या कमाईला तडाखा दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिसऱ्या आठवड्यातही KGF 2 बाबत मोठा ट्रेंड पाहायला मिळत आहे. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होऊ शकते. ईदच्या सुट्टीचा फायदा यशच्या चित्रपटाला मिळणार आहे. शुक्रवारपर्यंत तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने भारतात 353.6 कोटी कमाई केली आहे,.

KGF 2 फेम अभिनेता रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर मॉन्स्टर असल्याचे सिद्ध झाले आहे. KGF 2 ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. यासह दंगल, बाहुबली 2 आणि RRR नंतर 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचा हा वेग थांबताना दिसत नाही. आतापर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाला दंगलला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात मागे टाकता आलेले नाही. यशला KGF 2 कडून खूप अपेक्षा आहेत की त्याचे एकूण कमाई प्रथम बाहुबली 2 ला मागे टाकेल आणि नंतर दंगलला टक्कर देईल.

KGF 2 चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट कन्नड, हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलगू भाषेत डब करण्यात आला होता. पहिल्या पार्टलाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. चाहते आता KGF 3 ची वाट पाहत आहेत.


money laundering case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; 7 कोटींची मालमत्ता जप्त