दिग्गज-नवोदित गायकांची मैफल ‘खजाना गझल महोत्सव’

थॅलेसेमिक मुले आणि कर्करोगाने ग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खजाना’मध्ये गजलांचा अनोखा असा उत्सवच साजरा होतो. विशेष म्हणजे ‘खजाना आटीस्ट अलाऊड टॅलेंट हंट’ या भारतातील पहिल्या वहिल्या गझल गायकांची शोध स्पर्धा घेण्यात आली असून यामध्ये भारतातील ७५ शहरांमधून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते.

pankaj udhas,anup jalota,talat azeez
पंकज उधास,अनुप जलोटा आणि तलत अझीझ

भारतातील गझल,सूफी गायकिची परंपरा जपणाऱ्या आणि नवीन पीढिला त्याची ओळख करून देणाऱ्या सुप्रसिद्ध गझल गायकांची एक सुरेल मैफल खजाना गझल महोत्सव येत्या २७ आणि २८ जुलै रोजी मुंबईतील ऑबेरॉयमध्ये रंगणार आहेत.यामहोत्सवात प्रख्यात गझल गायक पंकज उदास,अनुप जलोटा,तलत अझीझ,रेखा भारद्धाज,सुदीप बॅनर्जी,बासरीवादक राकेश चौरसिया,सितारवादक पुर्बयान चॅटर्जी आणि तबलावादक ओजस अधिया आदी कलाकार सहभागीआहेत.यंदा महोत्सवाचे हे १७ वे वर्ष असून यामध्ये नवोदित कलाकारांनाही आपल्या गझल गायकीचा नमूना येथे दाखवण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई-द कॅन्सर एड असोसीएशन(सीपीएए),द पॅरेंटस असोशिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट(पीएटीयूटी)आणि द ओबेरॉय,मुंबई या तीन संस्थांनी मिळून कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्ण व मुलांसाठी निधी जमा करण्यासाठी‘खजाना’ या गझल महोत्सवाचे १७ वे पर्व नरीमन पॉइंट येथील द ओबेरॉय हॉटेलमधील रिगल रूममध्ये आयोजित केले आहे.यामहोत्सवाची घोषणा गझल गायक पंकज उदास,अनुप जलोटा, तलत अझीझ,गायक सुदीप बॅनर्जी,बासरीवादक राकेश चौरसिया,सितारवादक पुर्बयान चॅटर्जी आणि तबलावादक ओजस अधिया,तसेच उभरते गझल कलाकार पृथ्वी गंधर्व,दिवाकर मीना,राजविंदर कौर,गायत्री गायकवाड,आदित्य लांगेह,ओशिन भाटीया आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन(सीपीएए)चे अध्यक्ष वाय के सप्रू आदी मान्यवरांनी एका कार्यक्रमादरम्यान केली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलप्रेमींना भारतातील आघाडीच्या आणि नावाजलेल्या गझल गायकांच्या अदाकारीचा ऊंची आणि धारदार अनुभव महोत्सवात घेता येणार आहे.

यंदाच्या महोत्सवात ‘खजाना गझल फेस्टिव्हल’ची ‘मुहब्बत’ ही संकल्पनाराबवत असल्याचे पंकज उदास यांनी सांगितले. यातून प्रेमाच्या वैविध्यपूर्ण भावना व्यक्त होणार असून मी या निमित्ताने ओबेरॉय,सर्व कलाकार,प्रायोजक आणि रसिंकांचे आभार मानतो,असेही ते म्हणाले.थॅलेसेमिक मुले आणि कर्करोगाने ग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खजाना’मध्ये गजलांचा अनोखा असा उत्सवच साजरा होतो. विशेष म्हणजे ‘खजाना आटीस्ट अलाऊड टॅलेंट हंट’ या भारतातील पहिल्या वहिल्या गझल गायकांची शोध स्पर्धा घेण्यात आली असून यामध्ये भारतातील ७५ शहरांमधून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांचे परीक्षण पंकज उदास,रेखा भारद्वाज, तलत अझीझ, अनुप जलोटा आणि सुदीप बॅनर्जी यांचा समावेश होता. स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली.यातील दोन विजेत्या कलाकारांना बहुप्रतीक्षित अशा ‘खजाना गझल महोत्सवा’मध्ये गाण्याची संधी मिळणार आहे.जम्मू येथील आदित्य लांगेह आणि दिल्ली येथील ओशिन भाटीया हे दोघे ‘खजाना प्रतिभा शोध स्पर्धे’चे विजेते आहेत.या महोत्सावाच्या निमित्ताने गझल गायकीच्या चाहत्यांनी सुरेल मैफलीची मेजवानी मिळणार आहे.