एआर रहमानची लेक अडकली विवाह बंधनात

देशाचे प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेता एआर रहमानची मुलगी खतीजा रहमानचे नुकतेच लग्न पार पडले आहे. खतीजा रहमान, रियासदीन शेख मोहम्मद याच्याशी विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत.

एआर रहमान ने दिली माहिती
एआर रहमानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या मुलीच्या लग्नाचे फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, “ईश्वर या जोडीला आर्शिवाद द्या…तुमच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद” या फोटोला एआर रहमानचे चाहते कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)

शेअर केलेल्या फोटोमध्ये खतीजा रहमान आणि रियासदीन शेख मोहम्मद यांच्यासह एआर रहमान, सायरा बानो, ए आर अमीन आणि रहीमा रहमान दिसत आहेत.

डिसेंबर २०२१ मध्ये खतीजा आणि रियासदीन शेख मोहम्मद यांचा साखरपुडा झाला होता. एआर रहमानची मुलगी खतीजा सुद्धा एक गायिका आहे. तीने तमिळ चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच तिची पती रियासदीन शेख मोहम्मद ऑडियो इंजिनियर आहे. तो बऱ्याच दिवासांपासून एआर रहमान सोबत काम करत आहे. लग्नात खतीजाने आणि तिचा पती रियासदीन शेख मोहम्मदने एका रंगाचे कपडे घातलेले आहेत.

 


हेही वाचा :‘इर्सल’ चित्रपटातून पाहायला मिळणार माधुरी पवारची ठसकेदार लावणी