KKK 11 – अर्जुन बिजलानीने पटकावली ‘खतरो के खिलाडी’ची ट्रॉफी?

khatro ke khiladi winner is arjun bijlani
KKK 11 - अर्जुन बिजलानीने पटकावली 'खतरो के खिलाडी'ची ट्रॉफी?

छोट्या पडद्यावरील खतरो के खिलाडी 11 हा लोकप्रिय रियालिटी शो सध्या अंतिम टप्प्यावर असून लवकरच या सिझनचा ग्रँण्ड फिनाले एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. दरम्यान, चाहत्यांना यंदा सिझनचा विनर कोण ठरणार आहे याची प्रचंड उत्सुकतता लागून राहीली आहे. मात्र सोशल मीडियावर खतरो के खिलाडीचा विजेत्याच्या ट्रॉफीवर कोणी नाव कोरले आहे हे उघडकीस आले असून सगळीकडे स्पर्धक अर्जुन बिजलानी विनर ठरला असल्याचे कळत आहे. यानंतर बातमी व्हायरल होताच अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.(khatro ke khiladi winner is arjun bijlani)

शोमध्ये अंतिम फेरीत अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, वरुण सूद, विशाल आदित्य सिंह आणि राहुल वैद्य पोहोचले असून शेवटच्या एपिसोडमध्ये दिसले होते. मात्र अर्जुनने ट्रॉफी जिंकली आहे की नाही याबाबत अद्याप अधीकृत माहिती समोर आली नाहिये.तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतने पॅपराजी समोर चुकून अर्जुन बिजलानी जिंकला असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र वाहिनी कडून तसेच शोच्या मेकर्स कडून कोणतीही माहिती दिली गेली नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bijlani . AB (@arjunbijlani)

अर्जुन बिजलानीने नुकतचं त्याच्या इंस्टाग्राम अकांऊटवर एक फोटो पोस्ट केला आसून त्याला कॅप्शन दिले आहे की, आज पुन्हा एकदा एकत्र..आयुष्यभरासाठी हा क्षण लक्षात राहील. खतरो के खिलाडी सिझन 11. खूप मज्जा आली. सर्वांना प्रेम. अर्जुनच्या या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी अर्जुनच विजेता झाला असल्याचा अंदाज वर्तवला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यास सुरूवात देखील केली आहे. मात्र, खतरो के खिलाडी सिझन तेराचा खरा विजेता कोण ठरणार आहे हे लवकरच प्रेक्षकांच्या समोर उघड होणार आहे.


हे हि वाचा – Photo : सिद्धार्थ-कियारा करणार लग्न ?, सिद्धार्थने सांगितला संपूर्ण प्लॅन