घरमनोरंजनKhatron Ke Khiladi 11: 'खतरो की खिलाडी'मधून निक्की तांबोळी 'आऊट'? पून्हा केली...

Khatron Ke Khiladi 11: ‘खतरो की खिलाडी’मधून निक्की तांबोळी ‘आऊट’? पून्हा केली तीच चूक

Subscribe

स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ ला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. तर शोमधील प्रत्येक स्पर्धकालाही खूप प्रेम आणि पाठींबा दिला जातोय. मागील एपिसोडमध्ये एका स्पर्धकाला खेळातून काढून टाकण्यात आले. मात्र ‘खतरों के खिलाडी’ च्या आदल्या दिवसाचा एपिसोड मस्त झाला आहे. कारण सर्व स्पर्धकांनी टीम स्पिरिट दाखवले.
सर्व स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागले गेले होते. यात राहुल वैद्य आणि श्वेता तिवारी यांची टीम तयार करण्यात आली होती.

स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागले गेले

‘खतरों के खिलाडी 11’ च्या आदल्या दिवसाच्या स्टंटमध्ये राहुल वैद्यच्या टीममध्ये विशाल आदित्य सिंग, अर्जुन बिजलानी, वरुण शूद, मेहक चहल आणि निक्की तांबोळीचा समावेश होता. तर श्वेता तिवारीच्या टीममध्ये दिव्यांका त्रिपाठी, आस्था गिल, अभिनव शुक्ला, सना मकबूल आणि अनुष्का सेनचा समावेश होता. दोन्ही टीममध्ये बरेच वेगवेगळे स्टंट करण्यात आले. ज्यात अनेकांनी चमकदार कामगिरी केली तर अनेकांनी पुन्हा निराशा केली.

- Advertisement -

निक्कीने कार स्टंट केला पूर्ण

यात निक्की तांबोळीने एक स्टंट उत्तम प्रकारे केला, तर दुसरा स्टंट पूर्वीप्रमाणे अबॉर्ट केला. पहिल्या स्टंटमध्ये श्वेता तिवारीच्या टीममधील अनुष्का सेन आणि सना मकबूल, तर राहुल वैद्यच्या टीममधील निक्की तांबोळी आणि मेहक चहल यांनी कार स्टंट केला. प्रथम अनुष्का सेन आणि सना मकबूल यांनी हे टास्क केले. त्याचवेळी निकी आणि मेहकने हा स्टंट केला. निक आणि मेहकने या टास्कमध्ये चांगली कामगिरी केली आणि टास्क जिंकला.

निकने पून्हा केली तिच चूक

त्याचवेळी, निक्की तांबोळी समोर आणखी एक स्टंट होता, जो एक रॅप्टाइल स्टंट होता. राहुलच्या टीमकडून निक्कीला हा स्टंट करायचा होता तर श्वेताच्या टीममधून अनुष्का सेनला पुढे पाठवण्यात आले. मात्र या स्टंटमधील रॅप्टाइल्स आणि किड्यांना पाहून निकीने पून्हा हा स्टंट करण्यास नकार दिला. निक्कीच्या या कृतीमुळे राहुलची टीम चिंतेत सापडली. मात्र दुसरीकडे, अनुष्का सेनने हा स्टंट चांगल्या प्रकारे पूर्ण केला.

- Advertisement -

चाहते झाले हैराण 

‘खतरों के खिलाडी 11’ मधील निक्की तांबोळीचा परफॉर्मेंस पाहून चाहतेही हैराण झाले. सोशल मीडियावरुनही निक्कीविरोधात राग व्यक्त केला जातोय. कारण याआधीही निक्की तांबोळीने रॅप्टाइस स्टंट पूर्ण केला नव्हता. तिने सलग तीन वेळा हा स्टंट अबॉर्ट केले. त्यामुळे तिला शोमधून बाहेर करण्यात आले. मात्र वाइल्ड कार्डमधून निक्कीने पुन्हा शोमध्ये एंट्री मिळवली, मात्र तरीही तिच्यात कोणताही बदल झालेला नाही.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -