Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Khatron Ke Khiladi 11मधून थेट पाच खिलाडी बाहेर!

Khatron Ke Khiladi 11मधून थेट पाच खिलाडी बाहेर!

Related Story

- Advertisement -

कलर्स चॅनेलवरील ‘खतरो के खिलाडी ११’ या शोबद्दल (Khatron Ke Khiladi) चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या शोचे शूटिंग साउथ आफ्रिकामधील केपटाउनमध्ये सुरू आहे. माहितीनुसार, पुढच्या महिन्यात शोचे टेलिकास्ट होईल. पण अजून तारिख निश्चित झाली नाही आहे. पण शोसंबंधीत अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे. आता शोमध्ये शॉकिंग एविक्शन झाल्याचे समजत आहे. माहितीनुसार, शोमधून पाच खिलाडी एविक्टेड म्हणजेच बाहेर झाल्याचे समोर आले आहे. ते पाच खिलाडी कोण आहेत? त्यांची नावे उघड झाली आहे.

बिग बॉसचे एक फॅन पेज khabribaba.everything दिलेल्या माहितीनुसार, महक चहल, निक्की तांबोळी, आस्था गिली, सौरभ राज जैन आणि अनुष्का सेन ‘खतरो के खिलाडी ११’ शोमधून बाहेर झाले आहेत. यामुळे अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, श्वेता तिवारी, सना मकबूल हे टॉप ८मध्ये गेले आहेत. तसेच या टॉप ८ मध्ये विशाल आदित्य सिंहचे नाव देखील सामील आहे, परंतु अलीकडे विशाल एविक्टेड झाल्याची बातमी झाली होती. पण आता जोपर्यंत शो टेलिकास्ट होत नाही तोपर्यंत या माहितीवर शिक्कामोर्तब होत नाही.

- Advertisement -

पण खबरीबाबाची ही माहित खरी ठरली तर पहिल्यांदा शोमध्ये ५ खिलाडी बाहेर झाल्याचे घडेल. शो फॉरमेटनुसार प्रत्येक आठवड्याला एक किंवा दोन खिलाडी बाहेर होतात. यंदाच्या खतरो के खिलाडी शोमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आहेत, ज्यामध्ये राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंह, सौरभ राज जैन, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, सना मकबूल, महक चेहल, दिव्यांका त्रिपाठी, निक्की तंबोली, अनुष्का सेन, आस्था गिल यांचा समावेश आहे. गेल्या सीझन प्रमाणे येणारा सीझन देखील बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत आहे.


हेही वाचा – केदारनाथच्या सेटवर ड्रग्स घ्यायचे सारा-सुशांत ?, ‘या’अभिनेत्याने केला खुलासा


- Advertisement -

 

- Advertisement -