Khatron Ke Khiladi 12 : ‘खतरों के खिलाड़ी 12’मध्ये अक्षय कुमारची कडक एन्ट्री

रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाड़ी 12' मध्ये येत्या काळात अक्षय कुमारची कडक एन्ट्री आपल्याला पाहयला मिळणार आहे. अक्षय कुमार 'खतरों के खिलाड़ी 12' मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टी लवकरच त्याच्या ‘खतरों के खिलाड़ी 12’ या हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शोमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या शोसाठी ‘खतरों के खिलाड़ी 12’ मधील स्पर्धक केपटाउन पोहोचले आहेत. ‘खतरों के खिलाड़ी 12’ मध्ये यावेळी शिवांगी जोशी (Shivangi Joshi), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal), रुबीना दिलाइक, अनेरी वजानी, निशांत भट्ट, राजीव अदातिया (Rajiv Adatia), सृति झा आणि मोहित मलिक सहभागी झाले आहेत. रोहित शेट्टीचे शूटिंग सुद्धा आता सुरू झाले असून आता याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र आता लवकरच ‘खतरों के खिलाड़ी 12’ मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची एन्ट्री होणार आहे.

‘खतरों के खिलाड़ी 12’मध्ये अक्षय कुमारची कडक एन्ट्री

रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाड़ी 12’ मध्ये येत्या काळात अक्षय कुमारची कडक एन्ट्री आपल्याला पाहयला मिळणार आहे. अक्षय कुमार ‘खतरों के खिलाड़ी 12’ मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे. मात्र अद्याप अक्षय कुमार कडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

खरंतर अक्षय कुमारने ‘खतरों के खिलाड़ी’चा पहिला सीजन होस्ट केला होता. अक्षय कुमारने होस्ट केलेला हा सीजन चांगलाच प्रसिद्ध झाला होता. अक्षय कुमारनंतर ‘खतरों के खिलाड़ी’ला प्रियंका चोपडा, अर्जुन कपूर आणि रोहित शेट्टीने होस्ट केले आहे. या 12 व्या सीजनचे होस्टिंग रोहित शेट्टीच करत आहे.

याशिवाय अक्षय कुमार सध्या पृथ्वीराज चित्रपटात दिसणार आहे, 3 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अक्षय कुमार सोबत मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त यांच्या सुद्धा मुख्य भूमिका आहेत.

 


हेही वाचा :http://तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा करणार ‘Bigg Boss OTT 2’ चे होस्टिंग?