Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन खिलाडी अक्षय कुमारने पुन्हा जिंकल मन, गौतम गंभीरच्या संस्थेला दिला मदतीचा हात

खिलाडी अक्षय कुमारने पुन्हा जिंकल मन, गौतम गंभीरच्या संस्थेला दिला मदतीचा हात

अक्षयने गौतम गंभीर याच्या संस्थेला १ कोटी रूपयांचा मदत निधी दान केला आहे. गौतम गंभीर याने स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अनेक देशांमध्ये परत एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला जरी सुरवात झाली असली तरी कोरोना व्हायरसची दुसरी लाट झपाटयाने पसरत आहे. रुग्णालयातील आपुर्‍या बेड्स ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत. उद्योगधंदे बंद असल्यामुळे काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कठीण काळात लोकांच्या मदतीसाठी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार धावून आला आहे. अक्षयने गौतम गंभीर याच्या संस्थेला १ कोटी रूपयांचा मदत निधी दान केला आहे. गौतम गंभीर याने स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे आणि अभिनेता अक्षय कुमारचे आभार मानले आहे. गौतम गंभीरची संस्था गरजू गरीब व्यक्तींच्या खाण्याची तसेच औषधोपचाराची सोय करते गौतम याने ट्विट करत म्हंटले आहे की,” या कठीण काळात मदितची एक हात देखील आशेची किरण आहे.अभिनेता अक्षय कुमारने दिलला मदत निधि आम्ही गरजू लोकांच्या सेवेसाठी वापरू” असे ट्विट करत अक्षयचे आभार मानले आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने देखील ट्विट करत म्हंटले आहे की ”हा काळ खूप कठीण आहे. मला खूप आनंद होत आहे की मी तुम्हाला मदत करू शकतो. आपण लवकरन या वाईट वेळेतून बाहेर पडू.सुरक्षित रहा” असे ट्विट केले आहे.

- Advertisement -


काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. आता अक्षयची प्रकृती  पुर्णपणे स्वस्थ असून त्याची  कोरोना चाचणी नेगेटिव आली आहे.


हे हि वाचा – कंगनाकडून तापसी पुन्हा लक्ष्य, म्हणाली ‘she-man’, नेटीजन्स भडकले

- Advertisement -