खिलाडी अक्षय कुमारची कोरोनावर मात, ७ दिवसांच्या उपचारांनंतर रुग्णालायातून डिस्चार्ज

७ दिवसांच्या रुग्णालयातील उपचारानंतर अक्षयची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. नुकताच अक्षयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Khiladi Akshay Kumar covid 19 test is negative, discharged from hospital after 7 days of treatment
खिलाडी अक्षय कुमारची कोरोनावर मात, ७ दिवसांच्या उपचारांनंतर रुग्णालायातून डिस्चार्ज

खिलाडी अक्षय कुमारला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. मात्र आता अक्षयने कोरोनावर मात केली आहे. ७ दिवसांच्या रुग्णालयातील उपचारानंतर अक्षयची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. नुकताच अक्षयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली आहे. ‘आता सर्व काही ठिक आहे आणि अक्षय कुमारला पु्न्हा घरी पाहून सर्वजण खुश आहेत’,असे ट्विंकल खन्ना हिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा राम सेतूच्या सेटवर मुंबईच्या मढ आयलंडमध्ये शुटींग करत होता. चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती. ४ एप्रिलला अक्षय कुमार मुंबईच्या एच. एल.हिरानंदानी रुग्णालयात दाखल झाला होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अक्षयने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात असे म्हटले होते की, ‘तुमच्या आशिर्वादाचा माझ्यावर परिणाम होत आहे. मी बरा होत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला म्हणून रुग्णालयात दाखल झालो. लवकरच परत येईन. तुम्ही तुमची काळजी घ्या’,असे अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडवर पु्न्हा एकदा कोरोनाने विळखा घातल्याचे चित्र समोर आले. अनेक चित्रपटांच्या सेटवर कोरोनाने शिरकाव केला. खिलाडी अक्षय कुमारचा राम सेतू या सिनेमाचे नुकतेच शुटींग सुरु झाले होते. मुंबईच्या मढ आयलंडमध्ये १०० जणांची टिम राम सेतूचे शुटींग करत होती. मात्र शुटींगच्या दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षयला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्वत: अक्षयने दिली होती. राम सेतूच्या शुटींग क्रू मधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. १०० पैकी ४५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पॉझिटिव्ह आलेले सर्वजणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाचे संपूर्ण शुटींग पुढील १५ दिवसांसाठी रद्द करण्यात आले.


हेही वाचा – ‘हा’ अभिनेता साकारणार ”गुडबाय”मध्ये अमिताभच्या मुलाची भूमिका