घरमनोरंजनखिलाडी अक्षय कुमार ऑन फिल्ड, 27 जुलैला 'बेल बॉटम' होणार प्रदर्शित

खिलाडी अक्षय कुमार ऑन फिल्ड, 27 जुलैला ‘बेल बॉटम’ होणार प्रदर्शित

Subscribe

टिजरमध्ये अक्षयने फॉर्मल सूट परिधान केला आहे. तसेच त्याने हातात एक सुटकेस पकडत चालत जात 27 जुलै या तारखे समोर येऊन ऊभा राहत अल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड  खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांसाठी एक धमाकेदार गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. लवकरच अक्षयचा बहुप्रतिक्षीत आगामी सिनेमा ‘बेल बॉटम’ जगभरातील सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 27 जुलैला ‘बेल बॉटम’ थेटरमध्ये दाखल होणार असल्याचे अक्षयने घोषित केले आहे. यासोबतच अक्षयने सिनेमाचा टिजर देखिल लाँन्च केला आहे. टिजरमध्ये अक्षयने फॉर्मल सूट परिधान केला आहे. तसेच त्याने हातात एक सुटकेस पकडत चालत जात 27 जुलै या तारखे समोर येऊन ऊभा राहत अल्याचे दिसत आहे. याप्रकारे त्याने रिलीज डेट जाहिर केली आहे. सोशल मीडिया अकांऊटवर पोस्टा शेअर करत अक्षयने लिहले आहे की, “मला माहिती आहे तुम्ही सर्वजण ‘बेल बॉटम’ सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहात. सिनेमाची तारिख जाहिर करतांना मला भरपूर आनंद होत आहे.जगभरातील मोठ्या पडद्यावर दाखल होत आहे. बेल बॉटम 27 जुलै सिनेमागृहात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास कोरोना व्हायरस दरम्यान योग्य काळजी घेत सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले. तसेच सिनेमाचं संपुर्ण शुटिंग परदेशात झाले आहे. अक्षय सोबतच सिनेमात हुमा कुरैशी,वाणी कपूर,लारा दत्ता,यांच्या देखिल मुख्य भुमिका आहे. सध्या अक्षय त्याच्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये देखिल कमालिचा व्यस्त आहे. रक्षा बंधन,बच्चन पांडे,सुर्यवंशम सारखे सिनेमांमध्ये देखिल अक्षय कुमार झळकणार आहे.


हे हि वाचा – TeaControvercy: ‘अनुष्काला चहा देत होते..’ फारुख इंजीनियरच्या वक्तव्यावर MSK प्रसादने केला खुलासा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -