घरमनोरंजनअरे ही तर उर्फी जावेद! खुशी कपूरच्या 'बॅटमॅन' लूकवर चाहत्यांच्या कमेंट्स

अरे ही तर उर्फी जावेद! खुशी कपूरच्या ‘बॅटमॅन’ लूकवर चाहत्यांच्या कमेंट्स

Subscribe

बॉलिवूडची फेमस अभिनेत्री जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. खुशी कपूर इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे 854 हजार फॉलोवर्स आहेत. खुशी कपूर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जे युजर्संनाही आवडतात. नुकतचं खुशी कपूरने ब्लॅट ड्रेसमध्ये एक फोटोशूट केले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, अनेक सेलिब्रिटींनी त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहे. मात्र काही युजर्सना खुशीचा हा लूक पाहून चक्क उर्फी जावेदची आठवण आली आहे.

खुशी कपूरचा हा बॅटमॅन लूकमध्ये दिसली, तिने ब्लॅक रंगाचा ट्राएंगल जिग जॅग कट्स असलेला स्किन हग कट आऊट ड्रेस परिधान केला होता. यात खुशी अधिकचं सिजलिंग दिसतेय. काही वेळातचं खुशी कपूरचे हे फोटो व्हायरल होत आहे. खुशीच्या पोस्टवर कमेंट करताना काहींनी तिची उर्फी जावेदशी तुलना केली आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण, करिश्मा कपूर, जान्हवी कपूर, आलिया कश्यप आणि सुहाना खान यांनीही कमेंट करून खुशीचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

खुशी कपूर डेब्यूसाठी सज्ज

खुशी कपूर बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. खुशी झोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’ चित्रपटातून डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटातून आपल्या इनिंगची सुरुवात करणार आहे. काही वेळापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज झाले होते, ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -