बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आयुष्यात आता एक नवीन पर्व सुरू होणार आहे. कियारा अडवाणीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे. 28 फेब्रुवारीला तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे.
कियाराने बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर करत लिहिलं, “आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट लवकरच येत आहे.” तेव्हापासून कियारा व सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. या गुड न्यूजनंतर पहिल्यांदाच दोघं विमानतळावर पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी सिद्धार्थ कियाराची खूप काळजी घेताना दिसला. कियारा उतरताना गाडीचा दरवाजा उडताना सिद्धार्थ पाहायला मिळाला. त्यानंतर एकमेकांचा हातात हात पकडूनच दोघं चालताना दिसले.
View this post on Instagram
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे लग्न 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात पार पडले होते. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या जोडीने त्यांच्या पहिला एकत्र चित्रपट ‘शेरशाह’च्या सेटवर एकमेकांशी मैत्री केली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. ‘शेरशाह’ या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती, तर कियाराने त्याच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि त्यांचे नाते बहरत गेले. लग्नापूर्वी त्यांनी काही काळ डेटिंगही केली, पण ही गोष्ट त्यांनी गुप्त ठेवली होती. अखेर, 2023 मध्ये त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं ‘गेम चेंजर’नंतर आता कियारा ‘टॉक्सिक’, ‘वॉर 2’ चित्रपटात झळकणार आहे. तसंच सिद्धार्थ मल्होत्रा ‘परम सुंदरी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो गेल्या वर्षी ‘योद्धा’ चित्रपटात झळकला होता.