Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनKiara Advani : कियारा- सिद्धार्थ होणार आई- बाबा, Insta वर शेअर केली गुडन्यूज

Kiara Advani : कियारा- सिद्धार्थ होणार आई- बाबा, Insta वर शेअर केली गुडन्यूज

Subscribe

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडचं लाडकं कपल आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या या जोडीने नुकतीच चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने बाळाच्या पायातील मोज्यांचा फोटो शेअर केला आहे. अर्थात लवकरच सिद्धार्थ आणि कियाराच्या घरी पाळणा हलणार आहे. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Kiara Advani Announced Her Pregnancy On Social Media)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

अभिनेत्री कियारा अडवाणीने शेअर केलेल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट लवकरच येत आहे’. कियाराने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. कियारा आणि सिद्धार्थ लवकरच आई- बाबा होणार आहेत. त्यामुळे दोघेही प्रचंड आनंदी आहेत. लग्नाच्या 2 वर्षांनंतर कियाराने ही गोड बातमी दिली आहे. दरम्यान, येत्या काळात कियारा अडवाणी कोणतेही मोठे प्रोजेक्ट करणार नाही असं बोललं जातंय.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यामुळे दोघांचाही चाहता वर्ग फार मोठा आहे. कियारा- सिद्धार्थने 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अलीकडेच त्यांनी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. यानंतर आता लवकरच त्यांच्या सुखी संसाराला पालवी फुटणार आहे.

हेही पहा –

Pushkar Jog : हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय? चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित