Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कियारा अडवाणीला खऱ्या आयुष्यात असा हवा जोडीदार, कियाराने केला खुलासा

कियारा अडवाणीला खऱ्या आयुष्यात असा हवा जोडीदार, कियाराने केला खुलासा

गेल्या अनेक महिन्यांपासून कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत आहेत

Related Story

- Advertisement -
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने एम.एस.धोनी,कबीर सिंग यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कियाराने नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. कियाराने  विक्रम बत्रा यांच्या बायोपिक ‘शेरशाह’ मध्ये साकारलेली डिंम्पल चीमा यांची भूमिका देखील खूप गाजली असून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड भावली.  सिद्धार्थ आणि कियारा दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर तसेच बी-टाऊनमध्ये रंगत आहेत. मात्र दोघांनीही याचा अधीकृतपणे खुलासा केला नाहीये. शेरशाह सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघांनी नुकतच कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा कियाराला  विचारण्यात आले की, खऱ्या आयुष्यात तुला कसा मुलगा हवा आहे ? या प्रश्नाचे कियारा अगदी स्पष्टपणे उत्तर देत म्हणाली की, अभिनेता असेल तर ठिकच आहे. एका व्यक्तीमध्ये सर्व काही मिळेन  कियाराचे उत्तर ऐकून कपिल शर्मा देखील चकीत झाला. यानंतर त्याने कियारा आणि सिद्धार्थला टोमणे मारण्यास सुरुवात केली.(kiara advani need such a partene in real life kapil sharma was shocked to hear the answer)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

गेल्या अनेक महिन्यांपासून कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत आहेत. अनेक पार्टी, प्रमोशन इव्हेंटमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. तसेच कियारा गेल्यावर्षी डिसेंबर 2020 मध्ये तिच्या  सिद्धार्थ  सोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एंजॉय करायला गेली होती. तेव्हा सुद्धा अभिनेत्रीने तिच्या सुट्टीतील अनेक फोटो शेअर केले होते.वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास कियारा सध्या तिच्या आगामी चित्रपच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. जुग जुग जियो,भूल भुलैया 2,सारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -