बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता चाहत्यांना याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, कियारा अडवाणीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. ज्यात तिने आपल्या होणाऱ्या बाळाविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. तिने स्वतःला 2 मुलं हवीत असे सांगताना त्यापैकी एक मुलगी असावी आणि ती करीनासारखी असावी, अशी ईच्छा व्यक्त केली आहे. जाणून घेऊया कियारा नेमकं काय म्हणाली? (Kiara advani wants these qualities of Kareena Kapoor in her daughter)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. या मुलाखतीत कियाराने तिला दोन निरोगी मुले हवी असल्याचे सांगितले. ज्यावर कियाराला विचारण्यात आले की, जर तुझी मुलं जुळी असतील तर तुला मुलगे हवे की मुली? याचे उत्तर देताना कियारा म्हणाली, ‘मला फक्त 2 निरोगी मुले हवी आहेत’. याप्रकरणी करीनाने कियाराची बाजू उचलून घेतली. तेव्हा कियाराने सांगितले, ‘मला एक मुलगी आणि एक मुलगा हवा आहे. त्यापैकी मुलगी करिनासारखी असावी’.
कियाराला लेकीत हवे करीनाचे खास गुण
याविषयी अधिक बोलताना कियाराने तिची मुलगी करिनासारखी असावी असे सांगितले. ती म्हणाली, ‘मला माझ्या मुलीत करिनासारखा आत्मविश्वास आणि तिच्यासारखे तेजस्वी रूप हवे. खरं तर तिचे सर्व गुण असतील तरी चालेल’. ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या निमित्ताने कियारा आणि करीनाने एकत्र काम केले आहे. दोघींमध्ये चांगले मैत्रीचे नाते असून आता कियाराने आपल्या लेकीच्या बेबोचे गुण असावे अशी गोड ईच्छा व्यक्त केल्याचं समजतंय.
कियाराने तिच्या पेग्नेंसीची माहिती एका खास पोस्टद्वारे दिली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘ही आमच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी भेट आहे, जी आम्हाला लवकरच मिळणार आहे’. कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच ‘वॉर-2’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला होता.
हेही पहा –
Samantha Ruth Prabhu New Boyfriend : समंथा पुन्हा प्रेमात? कोणाला करतेय डेट?