Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कियाराने ४८ हजारांची साडी नेसून केलं शेरशाहच प्रमोशन

कियाराने ४८ हजारांची साडी नेसून केलं शेरशाहच प्रमोशन

फोटोमध्ये कियारा अगदी भारतीय नारी प्रमाणे शोभून दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने एम.एस.धोनी,कबीर सिंग यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कियाराने नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचा प्रर्यत्न केला आहे. कियारा आता विक्रम बत्रा यांच्या बायोपिक ‘शेरशाह’ या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रा सोबत झळकणार आहे. सध्या कियारा या सिनेमाचं प्रमोशन करण्यात प्रचंड व्यस्त आहे. याचदरम्यान कियाराने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहे. शेहरशाह सिनेमाच्या प्रमोशन इवेंट दरम्यान कियाराने एक हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.तसेच हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या आणि कानात झुमके, कपाळावर टीकली असा सिंम्पल पण स्टायलिश लूक कियाराने केला आहे. कियारा या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

साडीची किंमत पाहा-

कियाराने घातलेली साडी Torani ब्रांडची आहे.तसेच या साडीवर व्हाइट कलरच्या धाग्याने एम्ब्रॉयरडी करण्यात आली आहे. या साडीची मुळ किंमत 48 हजार 500 रुपये इतकी आहे.फोटोमध्ये कियारा अगदी भारतीय नारी प्रमाणे शोभून दिसत आहे. कियाराला नेहमीच काही हटके स्टाईल ट्राय करण्याच्या फंद्यात पडत नाही तर सहज सुंदर दिसणाऱ्या लूकमधूनच ती भाव खाऊन जाते. कियाराने केलेलं साधं फोटोशूट असो किंवा व्हॅकेशन मधील तिचा बिकनी लूक चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात.

- Advertisement -

सिद्धार्थ मल्होत्रा शेरशाह या सिनेमात शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कियारा आडवाणी विक्रम बत्रा याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून आली आहे.शेरशहा हा सिनेमा १२ ऑगस्टला अमॅझोन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. संपूर्ण सिनेमा हा कारगिल युद्धावर आधारित असणार आहे.

 


हे हि वाचा – ‘रंग दे बसंती’ सिनेमात काम करण्यासाठी आमिरने हृतिकला केली होती विनंती म्हणाला…

- Advertisement -