घरमनोरंजनडान्स करत झाली कियाराची एन्ट्री; लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

डान्स करत झाली कियाराची एन्ट्री; लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Subscribe

कियारा-सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सुरुवातीला सिद्धार्थ कियाराची वाट पाहताना दिसत आहे तेवढ्यात कियारा डान्स करत एन्ट्री करते.

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारी अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशातच कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडीओ देखील समोर आला आहे.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा-सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सुरुवातीला सिद्धार्थ कियाराची वाट पाहताना दिसत आहे तेवढ्यात कियारा डान्स करत एन्ट्री करते. कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना ईशारे करताना देखील दिसत आहेत. त्यानंतर दोघं एकमेकांना गळ्यात वरमाळा घालून किस करताना देखील दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकजण व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

सिद्धार्थ-कियाराचं लग्न चर्चेत

दरम्यान लग्नात कियाराने हलक्या गुलाबी रंगाची डिझायनर घागरा परिधान केला होता. सोबतच हिरव्या रंगाचा डायमन्ड हार घातला होता. तर सिद्धार्थने गोल्डन रंगाची एबरॉटी शेरवानी परिधान केली होती. यावेळी फोटोंसोबत खाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, “अब हमारी परमनंट बुकिंग हो गई, आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.” असं कियारा-सिद्धार्थने लिहिलंय. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नांच्या फोटोने बनवला रेकॉर्ड

- Advertisement -

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंना 13.49 मिलियनपेक्षा जास्त इंस्टाग्राम युजर्सने लाईक केलं आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची पोस्ट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट बनली आहे.

 


हेही वाचा :

बोनी कपूर यांनी केली श्रीदेवीच्या ‘श्रीदेवी द लीजेंड’ बायोग्राफीची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -