घरमनोरंजनVideo: राखीचा विमानाच्या टॉयलेटमध्ये Kiki डान्स

Video: राखीचा विमानाच्या टॉयलेटमध्ये Kiki डान्स

Subscribe

एअरहोस्टेसने विमानात डान्स करण्याची परवानगी न दिल्यामुळे, राखीने चक्क टॉयलेटमध्ये जाऊन आपली डान्सची हौस पूर्ण करुन घेतली.

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट ट्रेंड होईल याचा काहीच भरवसा नसतो. गेल्या अनेक दिवसांपासून #KiKiChallege ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. जो तो, जिथे तिथे किकी चॅलेंज करत सुटलाय. किकी चॅलेंमुळे घडलेल्या अपघांतामुळे अनेक ठिकाणी या डान्सवर कायदेशीर बंदीही घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी तरुणांचं किकी डान्स करण्याचं वेड काही कमी होत नाहीये. आतापर्यंत काही बॉलीवूडच्या काही स्टार्सनी केलेले किकी डान्सही तूफान व्हायरल झाला आहेत. मात्र, अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत हिने केलेला हा किकी डान्स जरा हटके आहे. राखीने चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये जाऊन किकी डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. गमतीचा भाग म्हणजे व्हिडिओ पाहताना आपल्या लक्षात येतं की राखीने सुरुवातीला एका एअरहोस्टेकडे विमानतच डान्स करण्याची परवानगी मागतली होती. मात्र, स्टाफकडून परवानगी न मिळाल्यामुळे तिने थेट विमानाच्या टॉयलेटमध्ये जाऊन किकी डान्सची आपली हौस पूर्ण करुन घेतल्याचं आपल्याला दिसतंय. तुम्हीही पाहा या मजेशीर व्हिडीओची एक झलक :

हेही वाचा : राखी म्हणतेय, ‘लग जा गले’ !

 

Muje kisi ne kiki danc nAhi karane deeya ??‍♀️??

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

- Advertisement -

 सौजन्य- राखी सावंत/इन्स्टाग्राम

विमानाच्या टॉयलेटमध्ये डान्स केल्याचा व्हिडिओ राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला असून, तिच्या चाहत्यांची या व्हिडिओला पसंती मिळते आहे. तर काही नेटिझन्स यावरुन राखीची खिल्ली उडवत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतो आहे. नेहमीच काही ना काही कारणामुळे आणि वादविवादांमुळे लाईम लाईटमध्ये राहणारी राखी सावंत या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘किकी चॅलेंज’ची स्टंटबाजी पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखी!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -