Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'तुमचाही मुसेवाला होणार' सलमानसह सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

‘तुमचाही मुसेवाला होणार’ सलमानसह सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

पोलिसांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी येथील घराबाहेर सुरक्षा वाढवली. पत्राचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे. दरम्यान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वीसुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पंजाबमधील रॅप सिंगर सिद्धू मूसेवालाची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. यानंतर मनोरंजन सृष्टीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पंजाबच्या अनेक सिंगरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु यानंतर आता बॉलिवूडमध्येही दबंग स्टार सलमान खान म्हणजेच भाईजान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी ( threats to salman khan) देण्यात आली आहे. या धमकीनंतर दोघांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलीम खान यांना अज्ञात व्यक्तीचे पत्र मिळाले असून यामध्ये तुमचाही मूसेवाला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.

अभिनेता सलमान खान याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खान आणि सलीम खान ज्या ठिकाणी रोज मॉर्निंग वॉकला जातात आणि विश्रांतीसाठी बसतात त्या बेंचवर धमकीचे पत्र मिळाले आहे. सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र मिळाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

धमकीचे पत्र स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून पत्र लिहिणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला आहे. सापडलेल्या पत्रामध्ये तुमचासुद्धा सिद्धू मूसेवाला करु अशी धमकी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पत्र सापडले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पोलीस तपासत आहेत. सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी विश्रांती घेण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी ते बसले यावेळी त्यांना पत्र मिळाले आहे.

पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

धमकीच्या पत्रानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी येथील घराबाहेर सुरक्षा वाढवली. पत्राचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे. दरम्यान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वीसुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली होती. नुकतीच गोळीबारामध्ये हत्या झालेला सिद्धू मुसेवाला याच्या खूनामागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये असून तेथूनच आपली गँग ऑपरेट करत असल्याचे सांगितले जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा : बॉलिवूडकरांना करण जोहरची पार्टी पडली महागात; कतरिनानंतर आता शाहरुखलाही कोरोनाची लागण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -