Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Met Gala 2021 मधील किम कर्दाशियनच्या लूकवर मिम्सचा पाऊस, करिनाचाही उडाला गोंधळ

Met Gala 2021 मधील किम कर्दाशियनच्या लूकवर मिम्सचा पाऊस, करिनाचाही उडाला गोंधळ

Related Story

- Advertisement -

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन(kim kardashian) नेहमी तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. किम बऱ्याचदा अशा स्टायलिश बोल्ड लूकमध्ये दिसतो की बऱ्याच वेळा पाहणारे चकीत होऊन जातात असे म्हणायला हरकत नाही. पण अलीकडेच किम ज्या लूकमध्ये मेट गाला 2021 (met gala) पोहोचली त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. नेहमी बोल्ड आणि हॉट लूकमध्ये दिसणारी किम यावेळी पूर्ण बॉडी कव्हरसह मेट गालाच्या रेड कार्पेटवर पोहोचली आहे. किमने यावेळी असा ड्रेस घातला आहे की तिचे शरीर एक इंचही दिसत नाही. डोक्यापासून पायांपर्यंत सर्वकाही काळ्या रंगाच्या ड्रेसने झाकलेले आहे, अगदी अभिनेत्रीचे नाक, केस, डोळे आणि बोटं. किमचा हा गेटअप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या किमचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्याची मजा नेटकरी आणि मिम्स मेकर घेत आहेत.दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही किमच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian)

- Advertisement -

यावर्षी मेट गालासाठी किमने काळ्या रंगाचा ड्रेस निवडला आहे. फोटोंमध्ये असे दिसते की तिने एक मोठा काळा गाऊन परिधान केला आहे यासह तिने काळ्या रंगाचे शूज घातले आहेत आणि तिने केस पोनी टेल मद्ये एखाद्या शेपटी सारखी विंचरली आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा चेहराही पूर्णपणे झाकलेला आहे. करीना कपूरने किमचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे ज्यात तिने एक प्रश्न विचारला आहे. फोटो शेअर करत करीनाने विचारले, ‘काय होत आहे’?

यासोबत सोशल मीडियावर लोक किमच्या ड्रेसची खिल्ली उडवत आहेत आणि सोशल मीडियावर अशा प्रकारे मजेदार मिम्स शेअर करत आहेत.

- Advertisement -


हे हि वाचा – प्रियांकाच्या मेट गाला लूकची नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली,सोशल मीडियावर झाली होती ट्रोल

- Advertisement -