Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन किम शर्माने लिएंडर पेससोबतच नातं स्विकारत शेअर केला रोमँटिक फोटो

किम शर्माने लिएंडर पेससोबतच नातं स्विकारत शेअर केला रोमँटिक फोटो

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माचे नाव गेली अनेक वर्षे अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत जोडले जात होते. मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये लव्ह अफेयरनंतर ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. अशातच किम शर्माने आता टेनिसपटू लिएंडर पेससोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. किम शर्माने लिएंडर पेससोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्यांचे रिलेशनशिप जग जाहीर केला आहे. अनेकदा दोघे एकमेकांसोबत फिरताना दिसले. गेली अनेक दिवस किम शर्मा आणि लिएंडर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र दोघांनीही आपल्य़ा नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु या फोटोवरुन दोघांमध्ये प्रेमाचं नातं असल्याचे मानल जात आहे.

या फोटोमध्ये किम शर्माने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर लिएंडर पेस निळ्या रंगाच्या टीशर्ट आणि निळ्या रंगाच्या डेनिममध्ये दिसतोय. किम कॅमेऱ्याकडे पाहून पोज देतेय तर लिएंडरच्या नजरा तिल्या चेहऱ्यावर खिळल्या आहेत. गोव्यातील व्हॅकेशननंतर किम शर्मा आणि लिएंडर पेसमध्ये लव्ह अफेयरच्या चर्चा रंगू लागल्या. या गोवा व्हॅकेशनचे दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी किम-लिएंडरमधील नाते पक्के केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kimi Sharma (@kimsharmaofficial)

- Advertisement -


किम शर्मा यापूर्वी हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती हर्षवर्धनच्या प्रेमात इतकी काही वेडी झाली होती की दोघं लग्न करतील अशा चर्चा होत्या. मात्र किमचे हर्षवर्धनसोबतचे रिलेशनशिप ब्रेक झाले. किमचे क्रिकेटपटू युवराज सिंग सोबतही रिलेशनशच्या चर्चा रंगू लागल्या. चार वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर किमचे युवराजसोबतचं नातं देखील तुटले.

या ब्रेकअपनंतर किमने भारत सोडून विदेशात जाऊन लग्न केल्याची बातमी समोर आली. किमने केनियाचे व्यापारी अली पणजनीशी तिने लग्न केले. मात्र हे लग्न दोन वर्षातचं तुटले. किम अली पणजनीसोबत कायदेशीर घटस्फोट घेत वेगळी झाली. यानंतर किमच्या आयुष्यात फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्नाची एंट्री झाली. मात्र या नात्यावर फारही समोर आले नाही. तर लिएंडर पेसचे संजय दत्तची एक्स वाईफ व मॉडेल रिया पल्लईसोबत लिव्ह रिलेशनशीप होते. यातून दोघांना एक मुलगीही देखील आहे.


Shravan Somwar 2021 : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट’


- Advertisement -