मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदेचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या पाठोपाठ आता अजून एका मराठी कलाकाराने आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. प्रेमाची कबुली देणारा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता किरण गायकवाड आहे.
‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला. नुकतंच किरणने त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. किरण आता आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरूवात करत आहे. त्याने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. वैष्णवी कल्याणकर असे किरणच्या होणाऱ्या पत्नीचे नाव असून ती सुद्धा एक अभिनेत्री आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सर्वाना सांगितले आहे. दोघांनीही रोमॅंटिक फोटोशुट करत त्याचेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले आहे. तु संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस, पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे. मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील , त्यांचं ठरतंय तोपर्यत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर, अशी पोस्ट किरणने लिहीली आहे.
आता किरण आणि वैष्णवीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. केवळ चाहतेच नाही तर मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. धनश्री कडगावकर, पृथ्वीक प्रताप, हेमंत ढोमे, पूर्वा शिंदे, माधूरी पवार, या कलाकारांनी त्यांना पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde