घरमनोरंजन'किरण्या...हल्ली तू...' अशोक सराफ-किरण मानेंच्या भेटीत चर्चा काय?

‘किरण्या…हल्ली तू…’ अशोक सराफ-किरण मानेंच्या भेटीत चर्चा काय?

Subscribe

आपल्या अभिनयाच्या जोरावर किरण मानेंनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बिग बॉस मराठी’तून किरण माने घराघरांत पोहोचले. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. रोखठोक मते मांडणारे किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता नुकतीच त्यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेतली आहे. मानेंनी पोस्ट शेअर करत ‘आज दिन बन गया’ असं ते म्हणाले आहेत.

किरण मानेंच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नुकतचे किरण माने व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भेट झाली. ‘मनोमिलन’ नाटकात दोघांनी एकत्र काम केले होते. मानेंनी या भेटीचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

- Advertisement -

किरण मानेंची पोस्ट

किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिले, “किरण्या… हल्ली तू तलवारच उपसलीयस… मस्त लिहितोस. मी वाचत असतो तुझे लेख. पूर्वी लै शांत होतास लेका. मुंबैत घर घेतलंस ना? नाय तर एक फ्लायओव्हर बांध सातार्‍यापास्नं इथपर्यंत. किती दिवस सातारा-मुंबई प्रवास करीत फिरणारंयस?” अशोकमामा भेटल्या-भेटल्या सुरू झाले. “लै लै लै दिवसांनी भेटलो मामांना. तेही शिवाजी मंदिरमध्ये. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. ‘मनोमिलन’ नाटकाच्या वेळची आमची घट्ट मैत्री आजबी मामांच्या मनात आहे हे बघून लै भारी वाटलं. मज्जा आली. आज दिन बन गया.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

 किरण मानेंची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

- Advertisement -

किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ‘सातारचा बच्चन’ म्हणून ते ओळखले जातात. ‘सिंधुताई माझी माई’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘सिंधूताई माझी माई’ मालिकेत त्यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या वडिलांची अभिमान साठेंची साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. कि आता लवकरच त्यांचा पहिला चित्रपट ‘तेरवं’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -