घरमनोरंजनलै हस्तोय च्यायाला....आमदार, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

लै हस्तोय च्यायाला….आमदार, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर शिवसैनिक भावुक झाले. दरम्यान आता अभिनेते किरण माने यांनी सुद्धा आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी उलथापालथ होत आहे. मंगळवारपासून एकामागेएक अश्या अनेक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यास योग्य वाटत नाही, त्यांनी हे येऊन मला सांगावे. मी हे पक्षप्रमुखपद सोडण्यास देखील तयार आहे. मी याचं क्षणी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. आयुष्यात ही पदं येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जे काम केले तिचं असते. अश्या भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. दरम्यान ते काल रात्री वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे रवाना झाले. उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर शिवसैनिक भावुक झाले. दरम्यान आता अभिनेते किरण माने यांनी सुद्धा आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

किरण मानेंच्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, “अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले! एवढं घडूनही ‘cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणाऱ्या, आक्रस्ताळेपणा करणाऱ्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणाऱ्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणाऱ्याला इतिहास लक्षात ठेवतो”.

याव्यतिरिक्त किरण माने यांनी अजून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अतिशय खोचक शब्दात आपले मत मांडले आहे.

- Advertisement -

“लै हस्तोय च्यायाला….आमदार या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय, नाय नाय, या आधीबी बंडखोरी झालीय की महाराष्ट्रात. लै वेळा झालीय. पन झालीय तवा खुलेआम झालीय. हितं मराठी मातीत रहाऊन. तोंडावर. स्वखुशीनं. पन ही काय अवस्था बघतोय! आरारारारा. भटकी जनावरं धरून कोंडवाड्यात भरावीत तशी अवस्था झालीय एकेकाची. त्या पत्रकारानं लाखात एक प्रश्न लाखात एक प्रश्न इचारलाय, “ऐसा क्या किया आपने जो आप भाग रहे है?”….ते आमदार गेलं खाली मान घालून. हाड तिच्यायला. आपून पाठीचा कना घिवून जन्माला आलोय भावांनो. काम काढून घेतलं तरी असल्या बांडगुंळांफुडं झुकलो नाय. तुरूंगात टाकलं तरी चालंल, जीव घेतला तरी चालंल, पन आईशप्पत अस्ली भयान अवस्था होऊन देनार नाय सोत्ताची…”

या पोस्टसोबत किरण माने यांनी बंडखोर आमदारांचा एक व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक आमदार पळताना दिसत आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -