घरमनोरंजनखरा माणूस कुणाच्या बापाला भेत नाय...किरण मानेंची पोस्ट चर्चेत

खरा माणूस कुणाच्या बापाला भेत नाय…किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Subscribe

किरण माने फेसबुकवर खूप सक्रिय असतात. ते वारंवार आपलं मत सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेते किरण माने वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेच्या वादामुळे चर्चेत आले. तेव्हापासून ते वारंवार सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतात. दरम्यान,आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत झी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत. सोबतच अभिनेत्री अनिता दातेचे सुद्धा कौतुक केले आहे.

किरण माने फेसबुकवर खूप सक्रिय असतात. ते वारंवार आपलं मत सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमातला असून त्यामध्ये अनिता दाते बोलताना दिसत आहेत. यावेळी तिने कोणत्याही कलाकाराला मालिकेतून अचानक काढून टाकण्याबाबत आपलं मत मांडल आहे.

- Advertisement -

‘झी मराठी’, तुमचे लै लै लै आभार… सहा महिन्यांपूर्वी माझ्या ‘अत्यंत वादग्रस्त ठरवल्या गेलेल्या’ विषयाला, तुमच्या प्राईम टाईममध्ये स्थान देऊन, त्यावर योग्य ते मत विचारायचं आनि मांडायचं ‘स्वातंत्र्य’ सुबोध भावे-अनिता दातेला दिल्याबद्दल ! खरंतर मी कधीच कुनाच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवली नव्हती. सत्यासाठी एकटा लढायची हिम्मत हाय माझ्यात. खरा मानूस कुनाच्या बापाला भेत नाय. पन त्यावेळी मूग गिळून गप्प बसलेल्या कणाहीन मराठी कलाकारांची दया मात्र आलीवती. “नक्की सेटवर काय घडलंय हे आम्हाला माहीती नाही.” या बुरख्याआड बिचारे जीव दडून बसले.

- Advertisement -

अशा शब्दांत किरण माने यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट शेअर करत झी मराठी वाहिनी आणि अनिता दातेचे आभार मानले आहेत.सध्या किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.


हेही वाचा : करण जौहरने उडवली ऊर्फीची खिल्ली? काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -