घरताज्या घडामोडीलै गुपितं उलगडायची हायेत...,kiran Mane यांची 4 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद

लै गुपितं उलगडायची हायेत…,kiran Mane यांची 4 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद

Subscribe

अभिनेता किरण माने म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील विलास पाटील भुमिका साकारणारा अनेक दिवसांपासून वादाच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील वातावरण तापले आहे. अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात अनेक सहकलाकारांनीही आरोप केले होते.

अभिनेता किरण माने म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील भुमिका साकारणारा अनेक दिवसांपासून वादाच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील वातावरण तापले आहे. अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात अनेक सहकलाकारांनीही आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणाला उगाचच राजकीय वळण लागलं आहे, अशी प्रतिक्रिया मुलगी झाली हो मधील कलाकार आणि दिग्दर्शक यांनी दिली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत अभिनेते किरण माने यांनी अनेक गोष्टींचे खुलासे करण्यासाठी उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबतची माहिती किरण माने यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

- Advertisement -

याप्रकरणाबाबत अनेक खुलासे करणे बाकी आहे. याशिवाय अनेक गुपित उलगडायची आहेत. हा लढा माझा नसून, तुम्हा सर्वांचाच आहे,अशा आशयाची सोशल मिडिया पोस्ट केली आहे. 4 फेब्रुवारीला दुपारी 3 : 30 वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत आहोत. आझाद मैदान पोलिस स्टेशनसमोर जमलं तर या, असे आवाहन किरण माने यांनी केले आहे.

काय आहे किरण मानेंची फेसबुक पोस्ट?

…लै खुलासे करायचेत.
लै गुपितं उलगडायची हायेत.
हा आता माझा एकट्याचा लढा नाय र्हायला. तुम्हा सगळ्यांचा झालाय.
तुमी कुठल्याबी क्षेत्रात असा, तुमाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुमाला कामावरनं काढायची छाती नाय झाली पायजे कुनाची.
कुठलीबी स्त्री असो वा पुरूष..तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा इचार करंल असं कायतर करून दाखवतो…संविधानिक मार्गानं.. बघाच तुमी !
#किरण_माने_पॅटर्न हितनं फुडं तुमच्यावर कस्लाबी अन्याय होऊ देनार नाय !!!
…आवो, पैशाचा… सत्तेचा… वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते… ‘संविधान’ !
मला वाटलंवतं की ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रनेचा ‘अंतरात्मा’ जागा होईल.. कुठल्यातरी राजकिय नेत्याला आपला सोत्ताचा संघर्ष आठवंल… पन नाय.. ९९% राजकीय नेते भांडलवलदारांचे गुलाम हायेत. माझ्यावर अन्याय करनारी यंत्रना पैशांच्या धुंदीत हाय… “आपण राजकिय नेते खिशात घेऊन फिरतो.. काहीही कारस्थान करू.. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय??? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला.” अशा मग्रूरीत हायेत ही धेंडं.
…पन भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाय. जीवाचं रान करीन.. रक्ताचं पानी करीन…होत्याचं नव्हतं करीन… पन न्याय मिळवूनच राहीन… जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तुम्हा सगळ्यांचा विजय आसंल… मेलो…तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागंल… मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर “एS तुझा किरण माने करेन.” असं सुनावलं जाईल…
पन काय बी म्हना.. या लोकांनी अन्याय करायला लै चुकीचा मानूस निवडला भावांनो.. नाय नाय नाय नाय… लै हार्ड मानसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी ! नाय ह्यांना पळता भुई थोडी केली तर किरण माने नांव लावनार नाय…
उद्या…४ फेब्रुवारी.. दुपारी ३.३० वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे प्रेस काॅन्फरन्स घेतोय… मुंबई प्रेस क्लब.. आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर, मुंबई. जमलं तर या.
जय जिजाऊ…जय शिवराय… जयभिम… तुकाराम महाराज की जय !

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -