Human: शेफाली शाहसोबत Kissing सीन शुट करताना मनात वेगळेच विचार आले होते – कीर्ती कुल्हारी

आम्ही या सीनसाठी कोणताही सराव केला नाही. थेट शुटींगवेळी आम्ही 8-10 टेक घेतले. मी माझी ऑनस्क्रिन व्हर्जिनीटी गमावली आहे. कारण मी ऑनस्क्रिन पहिल्यांदा किस केले आणि ते ही एका महिलेसोबत

Kirti Kulhari shared her experience of kissing scene in Human Web series with Shefali Shah
Human: शेफाली शाहसोबत Kissing सीन शुट करताना मनात वेगळेच विचार आले होते - किर्ती कुल्हारी

डिन्जी हॉटस्टार वर रिलीज झालेल्या ह्यूमन (Human)  या वेब सीरीजची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सीरीजमध्ये अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah)  आणि कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari)  यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बाजारात येणाऱ्या नवीन औषधांचा लोकांवर कशाप्रकारे प्रयोग करण्यात येतो, हे या सीरीजमधून दाखवण्यात आले आहे. औषधांच्या पहिल्या ट्रायलमध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांना कंपनी आणि डॉक्टर माणूकीच्या सीमा ओलांडून कशाप्रकारे आपल्या नोटा छापणारी मशीन बनवतात याचे चित्रण करण्यात आले आहे. कीर्ती कुल्हारी आणि शेफाली शाह यांनी या सीरीजमध्ये डॉक्टरांची भूमिका साकारली आहे.दोघी एकमेकांना किस करताना देखील दाखवण्यात आले आहे. (kissing scene in Human Web series)  शेफाली शाह सोबत किस करतानाचा अनुभव अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने शेअर केला. ( Kirti Kulhari shared her experience of kissing scene in Human Web series with Shefali Shah )

 

कीर्तीने म्हटले आहे की, ‘स्क्रिनवर शेफालीसोबत किस करणे सोप्पे नव्हते. हिंदुस्तान टाइम्सला किर्तीने दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली ती म्हणाली, एका महिलेसोबत तशी केमिस्ट्री बनवण्याचा प्रयत्न करणे हा विचार करणेच फार अवघड होते. प्रत्यक्ष सीन शूट करताना माझ्या मनात अनेक विचित्र विचार येत होते’.

कीर्ती पुढे म्हणाली, ‘मी एक अभिनेत्री आहे. अर्थात मी त्यासाठी नेहमीच तयार आहे मात्र तरीही एका महिलेसोबत किंसींग सून शूट करणे हे जरा विचित्र होते. कारण मी या आधी कधीही असे केले नव्हते. एक महिलेसोबत ती केमिस्ट्री बनवणे आणि तसे एक्सप्रेशन देणे फार अवघड होते. एका मुलासोबत किस करणे आणि महिलेसोबत किस करणे फार वेगळे होते’.

ह्यूमन या सीरीजमध्ये किसिंग सीन शूटींगचा अनुभव शेअर करत कीर्ती म्हणाली, ‘किसिंग सीन शूट करताना आमच्यापेक्षा आमचा दिग्दर्शक मोजेज सिंह हे जास्त नर्वस होते. सीन शूट करताना मी फक्त एकच विचार करत होते की, किस करताना मला काही वाटले तर? सीन दरम्यान मी काही उलट सूलट केले तर? मी खाली बसून विचार करू लागले की मला ही स्त्रियांमध्ये इंटरेस्ट आहे का? असे अनेक विचार माझ्या मनात येत असायचे. आम्ही या सीनसाठी कोणताही सराव केला नाही. थेट शुटींगवेळी आम्ही 8-10 टेक घेतले. मी माझी ऑनस्क्रिन व्हर्जिनीटी गमावली आहे. कारण मी ऑनस्क्रिन पहिल्यांदा किस केले आणि ते ही एका महिलेसोबत,असे मी शेफालीला सीन झाल्यानंतर म्हटले होते’.

 


हेही वाचा – अभिनेते किरण मानेंवरील कारवाई व्यावसायिक कारणांमुळे, पॅनोरामा एंटरटेनमेंटचे स्पष्टीकरण