घरमनोरंजनKishore Kumar Birthday : किशोर कुमार यांनी मधुबालाशी विवाह करण्यासाठी स्वीकारला इस्लाम...

Kishore Kumar Birthday : किशोर कुमार यांनी मधुबालाशी विवाह करण्यासाठी स्वीकारला इस्लाम धर्म, ४ लग्नांमुळे राहिले चर्चेत

Subscribe
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांची आज (४ ऑगस्ट) ९२ वी जयंती आहे. किशोर कुमार यांनी आपल्या करियरमध्ये अनेक भाषांमधून जवळपास १५०० हून अधिक गाणी गायली. ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली आणि गुणगुणली जातात. विशेष म्हणजे किशोर कुमार संगीताचे ज्ञान घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग घेतली नव्हती. त्यांच्या गाण्यांप्रमाणे त्यांचे चित्रपटही आज प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. १९४६ साली ‘शिकारी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
किशोर कुमार यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच त्यांचे खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले. किशोर कुमार यांचे खरं नाव आभास गांगुली असे होते. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना किशोर कुमार या नावानेच ओळख मिळाली. संगीत दिग्दर्शक एस.डी. बर्मन यांच्यांमुळे किशोर कुमार संगीत क्षेत्राकडे वळले. एका मुलाखतीत किशोर कुमार यांनी एस.डी.बर्मन यांच्या भेटीदरम्यानचे अनुभव शेअर केले होते. यावर बोलताना किशोर कुमार म्हणाले की, त्यांचा भाऊ अशोक कुमार यांच्या मदतीने ते एस.डी.बर्मन यांनी भेटू शकले. यावेळी त्यांचे भाऊ अशोक कुमार एस.डी.बर्मन यांनी म्हणाले की, माझा भाऊ (किशोर कुमार) थोडफार गातो. यावर किशोर कुमार पुढे सांगतात, त्यांनी एस.डी.बर्मन यांनी त्यावेळी एक बंगाली गाने गाऊन दाखवले. हे गाणे ऐकून सचिन दा म्हणाले की, हा तर मला कॉपी करतोय. मी याला नक्कीचं गाणे गाण्याची संधी देणं.

४ लग्नांमुळे किशोर कुमार राहिले चर्चेत 

किशोर कुमार यांचे संगीत क्षेत्रातील कारकिर्दीप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार चर्चेत राहिले. किशोर कुमार यांनी चार लग्नं केली होती. किशोर कुमार यांचा पहिला विवाह १९५१ साली अभिनेत्री रुमा गुहा यांच्यासह झाला होता. यावेळी किशोर दा बॉलिवूडमध्ये नवखे होते. मात्र विवाहाच्या आठ वर्षानंतर म्हणजे १९५८ साली दोघे विभक्त झाले. या घटस्फोटाचे मुख्य कारण म्हणजे किशोर दा आणि रुमा यांच्यात करियरवरून झालेले वाद. रुमा यांनी लग्न करुन घरं सांभाळावं अशी किशोर दा यांनी इच्छा होती, पण रुमा यांना बॉलिवूडमध्ये आपले यशस्वी करियर करायचे होते.
रुमाशी घटस्फोट झाल्यानंतर किशोर कुमार यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांच्याशी लग्नगाठ बांधली. किशोर दा मधुबाला यांचे सौंदर्य पाहून इतके काही घायाळ झाले होते की त्यांनी या लग्नासाठी स्वत:चे धर्मांतरण केले. किशोर दा यांनी मधुबाला यांच्याशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारून आपले नाव करिम अब्दुल असे ठेवले होते. पण लग्नआधीपासूनच मधुबाला आजाराने ग्रस्त होत्या. त्यामुळे लग्नानंतर काही वर्षांतच मधुबाला यांचे निधन झाले.
मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली यांची एंट्री झाली. या दोघांमध्ये अनेक वर्षे मैत्री होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांनी विवाह केला. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातचं त्यांच्या संसार मोडला. यानंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं.
योगिता यांच्याशी घटस्फोट घेताचं किशोर कुमार यांचे अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी सुत जुळले. आयुष्यातलं सर्वात शेवटे आणि चौथे लग्न किशोर कुमार यांनी लीना यांच्यासह केलं. या दोघांना विवाहानंतर सुमित कुमार नावाचा एक मुलगा आहे. लीना आणि किशोर कुमार यांच्यात २१ वर्षांचा फरक आहे. त्यामुळे या लग्नाला किशोर कुमार यांच्या आई-वडीलांचा विरोध होता.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -