Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजन'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत किशोरी अंबियेची एन्ट्री!

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत किशोरी अंबियेची एन्ट्री!

Subscribe

सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. पण आता मालिकेत एन्ट्री होणार आहे नव्या व्यक्तिरेखेची ती म्हणजे मयूरीची आत्या सत्यभामाची. या भूमिकेत किशोरी अंबिये दिसणार आहेत.

किशोरी अंबिये त्यांच्या निरनिराळ्या व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सगळ्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी नेहमी आपलं प्रेम दाखवलं आहे. आता ही नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का, हे येत्या रविवारी ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पाहता येईल. मयूरीची आत्या सत्यभामा या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे मालिकेत आणखीन रंगत येणार आहेत.

- Advertisement -

जोजोला यामिनी म्हणजेच राजवीरच्या आईने आणलं आहे. यामिनीची भूमिका अभिनेत्री दीप्ती केतकर करते आहे. यामिनीच्या ह्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं आहे. अन् तिला राजवीरशी लग्न करायचं आहे. यासाठी ती मयूरीसारखं वागण्याचा, तिला कॉपी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. या कामात राजवीरची आई यामिनी (दीप्ती केतकर) जोजोला मदत करतीये. राजवीर मात्र या परिस्थितीचा वापर मयूरीशी जुळवण्यासाठी शस्त्र म्हणून करताना दिसतोय.

आता आगामी काळात मयूरी-राजवीर अन् जोजो यांचा प्रेमाचा त्रिकोण कसा उलगडत जाणार? जोजो राजवीरला प्रेमात पाडण्यात यशस्वी होणार का? मयूरी-राजवीर आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार? जोजो अन् राजवीरची आई यांनी निर्माण केलेल्या कारस्थानाला मयूरी व राजवीर कसं उत्तर देणार? हे सर्व लवकरच ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेच, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आत्या आता मयूरीच्या लग्नाचा विषय घरी काढणार आहेत. त्यामुळे मयूरीवर एक वेगळं संकट येणार हे नक्की. तिला राजवीरकडे आपलं प्रेम व्यक्त करावं लागेल का? की आत्याच्या निर्णयाला सामोरं जाऊन ती सांगेल तिथेच लग्नाला होकार द्यावा लागेल. मयूरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला कळले असले, तरी मयूरी याचा खुलासा स्वतःहून कधी करणार व आपलं प्रेम कधी व्यक्त करणार, याच प्रतीक्षेत राजवीर असणार आहे. ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’, महाएपिसोड रविवार रात्री ८ वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पहायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -