घरमनोरंजन'त्या' कामासाठी मी अधिकाऱ्यांना कोंडले; ‘बस बाई बस’मध्ये किशोरी पेडणेकरांनी सांगितला किस्सा

‘त्या’ कामासाठी मी अधिकाऱ्यांना कोंडले; ‘बस बाई बस’मध्ये किशोरी पेडणेकरांनी सांगितला किस्सा

Subscribe

‘बस बाई बस’ कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी किशोरी पेडणेकरांनी सुबोध भावे आणि देखील महिलांबरोबर अनेक गप्पा मारताना दिसल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी आलेला नवा कोरा कार्यक्रम ‘बस बाई बस’ याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु करण्यात आला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात महिलांची ही राखीव बस एका स्पेशल व्यक्तींसाठी थांबली आहे. ‘बस बाई बस’ कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी किशोरी पेडणेकरांनी सुबोध भावे आणि देखील महिलांबरोबर अनेक गप्पा मारताना दिसल्या आहेत.

या दरम्यान, त्यांनी एक गमतीदार किस्सा सांगितला. यावेळी सुबोध भावेने त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही एकदा अधिकाऱ्यांना सहा तास एका खोलीत डांबून ठेवले होते, हे खरंय का? असा प्रश्न विचारला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर देत सांगितलं की, “2003-2004 साली एल्फि्स्टन परिसरातील काही लोक माझ्याकडे पाण्याचा प्रश्न घेऊन आले होते. त्यावेळी या भागात खूप पाणी साठायचे. त्यामुळे तिथे पाण्याची लाईन टाकणं हे खूप कठीण काम होते. परंतु मला त्या अधिकाऱ्यांकडून ते काम करवून घ्यायचे होते. परंतु मी नवीन होते त्यामुळे ते सर्वजण मला टाळायचे. त्यावेळी मी सुद्धा सरकारी नोकरी करून आले होते, त्यामुळे प्रशासन कसं चालतं आणि ते कसं चालवायचं, या दोन्ही गोष्टी मला चांगल्याच ठाऊक होत्या. त्यामुळे मी एक दिवस त्यांना भेटायला बोलावले होते. पण ते आल्यावर त्यांचे मोबाईल मी काढून कस्टडीत ठेवले. नंतर जोपर्यंत त्यांनी होकार दिला नाही, तोपर्यंत त्यांना सहाव्या मजल्यावरील एका खोलीत कोंडून ठेवलं. अखेर त्यांनी होकार दिला आणि ज्या कामासाठी मी त्यांना कोंडून ठेवलं ते काम झालं.”

सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किशोरी पेडणेकरांआधी या कार्यक्रमात राजकारणातील अनेक दिग्गज महिलांनी हजेरी लावली होती.


हेही वाचा : ‘कालसूत्र’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -