घरमनोरंजन'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10 ते 12 टक्के ओपनिंग दाखवली. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळपास 12 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 30 कोटी कमावले आहेत.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ ची कथा स्पर्श क्षेत्रपाल यांनी लिहिली आहे. टीझरपासून ते रिलीज झालेल्या गाण्यांपर्यंत आणि ट्रेलरपर्यंत लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. सलमानचे चाहते मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. त्याचवेळी, पहिल्या दिवशी, चित्रपटाला सोशल मीडियावरील नेटकऱ्यांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

- Advertisement -

सलमान खान चित्रपट निर्मिती, किसी का भाई किसी की जान फरहाद सामजी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

जगभरात 5700 स्क्रीनवर प्रदर्शित

‘किसी का भाई किसी की जान’ 100 हून अधिक देशांमध्ये 1200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. त्याचवेळी, हा चित्रपट जगभरात 5700 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. मोठ्या प्रमाणात रिलीज होऊनही, चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन अपेक्षेपेक्षा थोडे कमी होते. या चित्रपटाने जगभरात 30 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

पामेलामुळे यश चोप्रांना राणी मुखर्जीला सून म्हणून स्वीकारावे लागले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -