घर मनोरंजन सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ची यूएस-कॅनडात रेकॉर्ड ब्रेक कमाई

सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ची यूएस-कॅनडात रेकॉर्ड ब्रेक कमाई

Subscribe

बॉलिवूड मधील अभिनेता सलमान खान याचा नवा सिनेमा किसी का भाई किसी की जान हा नुकत्याच ईदच्या मुहूर्तावर सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कॅनडा आणि अमेरिकेत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. अशातच अशी अपेक्षा केली जात आहे की, हा सिनेमा आपल्या पहिल्या विकेंड पर्यंत १ मिलियन म्हणजेच जवळजवळ ८ कोटींची कमाई करु शकतो. चार वर्षानंतर रुपरे पडद्यावर आलेला सलमानचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंदीस पडतोय. याआधी जून २०१९ ला ‘भारत’चा प्रीमियर झाला होता.

हॉलिवूड ट्रेंन्ड अॅनालिस्ट गीतेश पंड्याने ट्विटकवर असे सांगितले की, सलमानच्या नव्या सिनेमाने यूएस-कॅनडात 300K डॉलरची कमाई केली आहे. टॉप २० कमाई करणाऱ्यां सिनेमांपैकी तो १२व्या क्रमांकावर कॅनडात आहे. हा सिनेमा आपल्या ओपनिंग विकेंड पर्यंत १ मिलियन पर्यंत पोहचू शकतो.

- Advertisement -

भारतात किसी का भाई किसी की जानची जादू चाललेली नाही. कारण येथील बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई झालेली नाही. केवळ १५.८१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा जवळजवळ एका दशकातील सलमानचा दुसरा सर्वाधिक कमी ईद ओपनर झाला ठरला आहे.

- Advertisement -

सलमान व्यतिरिक्त किसी का भाई किसी की जान मध्ये वेंकटेश दग्गुबत्ती, पूजा हेगडे, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी, विनाली भटनागर, विजेंदर सिंह हे सुद्धा दिसून येणार आहेत. सिनेमा अजित-अभिनीतत वीरम (२०१४) चा हिंदी रिमेक आहे.


हेही वाचा- अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे मोशन पोस्टर रिलीज

- Advertisment -