‘किसी का भाई किसी की जान’ चा दमदार टीजर रिलीज

‘किसी का भाई किसी की जान’ या भाईजान सलमान खानच्या सिनेमाची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. यात सलमान सोबत यात पूजा हेगड़े तसेच साउथ सुपरस्टार वेंकेटश दग्गुबतीची झलक पाहायला मिळणार आहे.

काय आहे टीजरमध्ये?
1 मिनट 43 सेकेंदाचा हा ट्रेलर असून याची सुरुवात सलमानच्या डायलॉग ने होते . “सही का होगा सही, गलत का होगा गलत” या डायलॉग नंतर एक फाईट सीन दिसतो. मग एंट्री होती सिनेमाची हिरोईन पूजा हेगडेची. चित्रपटाचा साऊथ कनेक्शन दिसत आहे. यात पहिल्यांदा सलमान धोती- कुर्ता परिधान केल्याला साउथ इंडियन अवतारात आहे. टीझरमध्ये सलमान ‘लुंगी डान्स’ सारख्या गाण्यावरही डान्स करताना दिसत आहे. हा चित्रपट मिली फॅमिली एंटरटेनर
असल्याचे आधीच सांगितले जात होते. या सिनेमात सलमान खान तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. वाढलेले केस आणि दाढी. दुसरा क्लीन शेवन लुक.. आणि तिसरा लूक तो आजकाल कॅरी करतोय आणि या सगळ्या लूकमध्ये तो जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. हे सर्व पाहून आता सलमान खानचे चाहतेही म्हणू लागले आहेत – ब्रिंग इट ऑन!

आज ‘पठाण’ सोबत चित्रपटगृहांमध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. लोक थिएटरमधून या टीझरची रेकॉर्ड केलेली क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करत होते. त्यानंतर अखेर निर्मात्यांनी संध्याकाळी 4 वाजता यूट्यूबवरच टीझर रिलीज केला.

फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’चे दिग्दर्शन केले आहे. याआधी त्याने ‘बच्चन पांडे’ आणि ‘हाऊसफुल 4’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. फरहादने त्याचा भाऊ साजिद सामजीसोबत ‘एंटरटेनमेंट’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. लेखक म्हणून त्यांनी ‘रेडी’, रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’ पासून ‘सूर्यवंशी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘सिम्बा’पर्यंतचे चित्रपट लिहिले आहेत. आता तो सलमानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ दिग्दर्शित करत आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये सलमान, पूजा व्यतिरिक्त जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर या स्टार्सची ही झलक पाहायला मिळतेय. किसी का भाई किसी की जान यंदा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सलमान खान ‘अंतिम’ सिनेमात दिसला होता. सलमानसाठी ईद एक खास दिवस असल्याचे बोलले जाते. ईदच्या दिवशी रिलीज झालेले एक था टायगर, किक, बजरंगी भाईजान आणि सुलतान हिट ठरले होते.