Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन KKK11- शोच्या फिनाले पूर्वीच अभिनव शुक्ला झाला आऊट,चाहते झाले नाराज

KKK11- शोच्या फिनाले पूर्वीच अभिनव शुक्ला झाला आऊट,चाहते झाले नाराज

अभिनव अंतिम फेरीच्या इतक्या जवळ येऊन शोमधून बाहेर पडल्यावर चाहते निराश झाले आहे.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खतरों के खिलाडी 11(KKK11)रिअॅलिटी शो आता शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. या आठवड्यात शोचा सेमी-फिनाले एपिसोड सूरू असून या एपिसोड मध्ये यंदा डबल एलिमिनेशन होणार असल्याचे कळतेय. शनिवारच्या एपिसोडमधून फिनाले पूर्वीच , शोचा उत्कृष्ट स्पर्धक अभिनव शुक्ला (Abhinav Shukla)आऊट झाला.आणि त्याचबरोबर आजच्या रविवारच्या एपिसोडमध्येही एका स्पर्धकाचा प्रवास शोमध्ये संपेल अशी माहिती समोर येत आहे.(kkk11 abhinav shukla out befor finale)

यावेळी अभिनव शुक्ल, श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंग स्टंट हरल्यामुळे एलिमिनेशन फेरीत पोहोचले होते, जिथे तिघांमध्ये फेस ऑफ झाले होते. एलिमिनेशन फेरीत तिन्ही स्पर्धकांना उंचीवरून चेंडू टोपलीत टाकावे लागणार असा टास्क देण्यात आला होता. मात्र, तिघांपैकी कोणीही चेंडू टोपलीत टाकू शकला नाही. आणि यादरम्यान, अंतिम चेंडू टाकण्यापूर्वी अभिनव खाली पडला, ज्यामुळे त्याला शोमधून बाहेर निघावे लागले. अभिनव नंतर, दुसऱ्या स्पर्धकाचा प्रवास आज शोमध्ये संपणार असल्याने पुढील स्पर्धक कोण असणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

दुसरीकडे अभिनव अंतिम फेरीच्या इतक्या जवळ येऊन शोमधून बाहेर पडल्यावर चाहते निराश झाले आहे आणि शोमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आनंदी तितकेच आनंदी देखील झाले आहेत. चाहत्यांच्या मते अभिनव एक अष्टपैलू खिलाडी आहे. त्याने केलेल्या सर्व प्रकारचे स्टंटबद्दल त्याचे कौतुकही करत आहेत.बरेच चाहते अभिनवला शोचा खरा विजेता मानतात. एका चाहत्याने अभिनवसाठी लिहिले, “स्पर्धक ज्याने सर्व प्रकारचे स्टंट केले. अभिनव तू ​​एक अष्टपैलू आहेस. जंगल बॉय आम्हाला तुझा अभिमान आहे.”


- Advertisement -

हे हि वाचा – कंगना करणार राजकारणात एंट्री ?, थलायवी सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान केला खुलासा

- Advertisement -