Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन KKK11: स्पर्धक वरुण सूदला स्टंट करताना गंभीर दुखापत

KKK11: स्पर्धक वरुण सूदला स्टंट करताना गंभीर दुखापत

वरुणच्या हाताला दुखापत झाल्याने त्याला फ्रॅक्चर झाली आहे अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. पण काही तासांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची तब्येत बरी झाली

Related Story

- Advertisement -

“खतरो के खिलाडी 11” च्या सिझनला छोट्या पडद्यावर धमाकेदार सुरूवात झाली आहे. सगळे स्पर्धक साउथ अफ्रीकेला रवाना झाले आहेत. स्पर्धकांच्या यादित यावेळेस दिव्यांका त्रिपाठी, विशाल आदित्य सिंह, वरुण सूद, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, अनुष्का सेन , श्वेता तिवारी या प्रसिद्ध टिव्ही स्टार झळकणार आहेत. सर्व स्पर्धक सध्या सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक फोटो व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण मालिका सुरु होण्याआधीच मालिकेमधील लोकांवर भले मोठे संकट समोर ऊभे राहिले आहे. शो मधिल स्पर्धक आणि अभिनेता वरुण सूद (Varun Sood) गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ताबडतोब त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varun Sood (@varunsood12)

- Advertisement -

या शोची संपुर्ण थीम हि वेगवेगळ्या आव्हानात्मक तसेच धोकादायक स्टंटवर अवलंबित असून या शोचे शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे. या शोमधील सगळे स्टंट्स हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले जातात. पण अनेकदा स्टंट करतांना अनेकजणांसोबत दुर्घटना घडते ईटाइम्सच्या वृत्तनुसार, वरुण सूद काहि दिवसांपूर्वी एक धोकादायक स्टंट करत असताना जखमी झाला आहे. तसेच अपघातानंतर वरुणला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, डॅक्टरांनी त्याच्यावर आवश्यक ते उपचार केल्यानंतर वरुणला 2 ते 3 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. वरुणच्या हाताला दुखापत झाल्याने त्याला फ्रॅक्चर झाली आहे अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. पण काही तासांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची तब्येत बरी झाली. आणि त्याच दिवशी तो सेटवर पोहोचला.

या अपघातानंतर शोचा होस्ट आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी अशी घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेतली आहे. कोणत्याही सेलिब्रिटी स्पर्धकाला दुखापत होणार नाही, यासाठी आता अधिक खबरदारी घेतली जाणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – भारतीय स्टार्स जाहिराती द्वारे कमावतात करोडो

- Advertisement -