घरमनोरंजनKKK11:' खतरो के खिलाडी' सिझन 11 चा धमाकेदार प्रोमो लाँच

KKK11:’ खतरो के खिलाडी’ सिझन 11 चा धमाकेदार प्रोमो लाँच

Subscribe

रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावर 'खतरो के खिलाडी 11' डर वर्सेस डेयर लवकरच कलर्स टिव्हिवर येणार आहे.

“खतरो के खिलाडी 11” च्या सिझनला छोट्या पडद्यावर धमाकेदार सुरूवात झाली आहे. सगळे स्पर्धक साउथ अफ्रीकेला रवाना झाले आहेत. स्पर्धकांच्या यादित यावेळेस  दिव्यांका त्रिपाठी, विशाल आदित्य सिंह, वरुण सूद, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, अनुष्का सेन , श्वेता तिवारी या प्रसिद्ध टिव्ही स्टार झळकणार आहेत. सर्व स्पर्धक सध्या सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक फोटो व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतच सर्व स्पर्धकांनी दिग्दर्शक तसेच “खतरो के खिलाडी 11” मधील होस्ट,परिक्षक रोहित शेट्टी सोबत पोस्ट शेअर केली आहे. आता या बहुप्रतिक्षीत मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. रोहित शेट्टीने स्वतः याचा प्रोमो रिलीज केला आहे. यासोबतच लवकरच हा शो टिव्हीवर प्रसारीत होणार आहे अशी घोषणा देखिल करण्यात आली आहे.

काय दाखवलं आहे प्रोमोमध्ये

प्रोमोच्या सुरूवातीला रोहित शेट्टी एका स्पिड कारने हेलीकॉप्टरमध्ये चढतो. तसेच एका सिंहा सोबत संवाद साधताना देखिल दिसून येत आहे. रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावर ‘खतरो के खिलाडी 11’ डर वर्सेस डेयर लवकरच कलर्स टिव्हिवर येणार आहे.” अश्या आशयाचे कॅप्शन देत शो लवकरच प्रसारीत होणार असल्याचे सांगितले आहे. रोहितने सात वर्षापुर्वी ‘खतरो के खिलाडी’ च्या प्रवासाला केपटाऊन मधुनच सुरूवात केली होती.याच स्टंट पायलट सोबत. वॉरेन हा माझ्या मते जगातिल सर्वोत्कृष्ठ स्टंट पायलट आहे. सात वर्षे तसेच सात सिझन नंतर हे जन खुप बदलेले दिसून येत आहे. पण शोमधिल स्पिरीट आजही कायम आहे. तुम्ही सगळे पुन्हा तयार व्हा घेऊन येत आहोत “खतरो के खिलाडी 11” अश्या फुल जल्लोशात रोहित शेट्टिने या मालिकेची घोषणा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -