Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नाईकांची 'मल्याळी' सून आहे तरी कोण?

नाईकांची ‘मल्याळी’ सून आहे तरी कोण?

मालिकेमधील विविध व्यक्तीरेखांबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात अगदी घराघरात पोहचलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचे प्रोमो पाहूनच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी जोरदार चर्चा सुरु झाली होती. आता ही मालिका सुरु होताच मालिकेतील एक एक पात्र समोर येत आहे. यामुळे मालिकेमधील विविध व्यक्तीरेखांबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या दोन भागातील काही व्यक्तीरेखा या भागातही पाहायला मिळत आहे. यातीलच एक व्यक्तीरेखा म्हणजे अभिरामची बायको आहे. पहिल्या दोन भागात अभिरामची बायको म्हणून ‘देविका’ ही सर्वांना परिचित होती. मात्र या भागात ‘देविका’ ऐवजी ‘कावेरी’ ही अभिरामच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसतेय. कावेरीच्या निमित्ताने एक प्रसिद्ध चेहऱ्याने मालिका विश्वात पदार्पण केले आहे. या ‘कावेरी’ची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचे नाव भाग्या नायर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 भाग्या ‘itsuch’ या युट्युब चॅनेलवरील वेब सिरीजमधून प्रेक्षकांसमोर आली होती. या मालवणी भाषिक मालिकेत भाग्याने तिच्या खास मल्याळम शैलीने एक वेगळाच ट्वीस्ट आणला आहे. लहानपणापासून भाग्याला अभिनयाची आवड होती. विविध एकांकिका स्पर्धेतून सहभागी होती. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर तिने अनेक एकांकिका स्पर्धामध्ये पारितोषिकेही पटकवली आहेत. अभिनयाबरोबरच भाग्या ही उत्तम रत नाट्यम नृत्यांगणा आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांना भूरळ पाडणारी भाग्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत दिसणे म्हणजे चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. यात या मालिकेत आता भाग्या ही शेवंताच्या रुपात दिसल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.


- Advertisement -

हे वाचा- बॉलिवूडमधील आणखी एक कपल विभक्त

- Advertisement -