शेजाऱ्यांनाही ठाऊक नाही मास्टर भिडेच खरं नाव, वीज बिलही येतं ‘भिडे’ नावानेच

know the unknown facts about taarak mehta ka ooltah chashmah fame master bhide aka actor mandar chandwadkar
शेजाऱ्यांनाही ठाऊक नाही मास्टर भिडेच खरं नाव, वीज बिलही येतं 'भिडे' नावानेच

छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  एका दशकापेक्षाही जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांनीही या मालिकेला अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहेत. मालिकेतील जेठालाल, तारक, दयाबेन, भिडे, बबिताजी अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर  वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या पात्रामुळे आज त्यांची ओळख आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अशातच एक रंजक माहिती समोर येत आहे. मालिकेत मास्टर आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणार अभिनेता मंदार चांदवडकर यांना त्यांच्या खऱ्या नावाने कोणी ओळखत नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. आज मंदार चांदवडकर त्यांचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त त्यांच्या अभिनयाशी निगडीत रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

मंदरा यांनी अनेक मराठी मालिका,नाटकांमध्ये काम केलं आहे.तसेच त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.  तारक मेहता मधील आत्माराम भिडे या पात्राने त्यांची ओळख घरोघरी झाली. लोकं त्यांच्या मूळ नावाने कमी आणि भिडे या नावानेच जास्त ओळखतात. गोकूळधाम सोसायटी आणि भिडे हे पात्र आता मंदार यांची खरी ओळख बनून गेली आहे असे म्हणायला हरकत नाही. इकेचं नाही तर शेजारी सुद्धा त्यांना भिडे या नावानेच हाक मारतात. सर्वात गंमतीशीर भाग म्हणजे त्यांच्या घराचे वीज बिलदेखील मास्टर भिडे याच नावावर येते.

मनोरंजन सृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी मंदार यांनी दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम केलं . 2000 साली त्यांनी नोकरी सोडून नाटक व मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मंदार हे कोट्यवधी संपत्तीचे मालक असून. मालिकेतील एका एपिसोडसाठी तब्बल 45 हजार रुपये मानधन घेत असल्याची माहिती समोर येत आहे.


हे हि वाचा – Video: गणेश आचार्य आणि त्याच्या मुलीचा रोमँटिक डान्स पाहून व्हाल थक्क