Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Met Gala2021 रेड कार्पेटवर झळकलेली भारतीय महिला सुधा रेड्डी आहे तरी कोण?

Met Gala2021 रेड कार्पेटवर झळकलेली भारतीय महिला सुधा रेड्डी आहे तरी कोण?

.सुधा रेड्डी या हैदराबादस्थित अब्जाधीश उद्योगपती मेघ कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी आहेत. एवढेच नाही तर ती MEIL ची संचालक देखील आहे. सुधा एक सामाजिक कार्यकर्ता आहे.

Related Story

- Advertisement -

मेट गाला इव्हेंट जगभरातील सेलिब्रिटींसाठी खूप खास असतो. या वार्षिक वेशभूषा शोमध्ये प्रत्येक आंतरराष्ट्रीय कलाकार  स्पर्धेत झळकतात. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील या जागतीक स्पर्धेत सहभाही होते. मात्र, यावेळी प्रियांका चोप्रा ऐवजी सुधा रेड्डी मेट गालामध्ये उपस्थित राहणारी भारतीय महिला आहे.सध्या सुधा रेड्डीचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक तिच्या लूक आणि आउटफिटबद्दल खूप चर्चा करत आहेत. सुधा रेड्डी कोण आहे हे जाणून घेण्याचा लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. इतक्या आकर्षक पद्धतीने मेट गाला इव्हेंटमध्ये तिची उपस्थिती पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

यावेळी सुधा मेट गालामध्ये उपस्थित राहणारी पहिली नॉन-फिल्म सेलिब्रिटी भारतीय आहे. मेट गालामध्ये  सौंदर्यांने चकित करणाऱ्या सुधा रेड्डी या हैदराबादच्या व्यावसायिक महिला आहेत.सुधा रेड्डी या हैदराबादस्थित अब्जाधीश उद्योगपती मेघ कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी आहेत. एवढेच नाही तर ती MEIL ची संचालक देखील आहे. सुधा एक सामाजिक कार्यकर्ता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudha Reddy (@sudhareddy.official)

- Advertisement -

आता सुधा रेड्डीच्या मेट गाला लूकबद्दल जाणून घेऊया, जेव्हा सुधा रेड्डी प्रसिद्ध फॅशन डिझायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांचा सुंदर आऊटफीट परिधान करुन लोकांसमोर आली तेव्हा तिला पाहून सर्वजन स्तब्ध झाले.
सुधाच्या पोशाखाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा ड्रेस आणखी आकर्षक बनवण्यासाठी तिने 18 कॅरेट सोन्याचे आणि 35 कॅरेट डायमंडने बनवलेले ईयर कफ देखील घातले होते.सुधा रेड्डीच्या सोनेरी प्रिंटेड गाऊनचे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये स्वारोस्की क्रिस्टल्स, सोन्याचे मणी , लाल आणि नेव्ही ब्लूचे सिक्वन्स अतिशय काळजीपूर्वक वापरण्यात आले होते. अमेरिकन ध्वजाची प्रिंट या पोशाखात बनवण्यात आली होती, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

- Advertisement -

प्रियंका गेल्या अनेक वर्षांपासून मेट गालामध्ये हजेरी लावत होती. त्याचबरोबर दीपिका पदुकोण सुद्धा अनेक वेळा दिसली आहे. मात्र, यावेळी सुधा रेड्डी तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.


हे हि वाचा –  MetGala 2021-हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड रणवीर सिंगच्या फॅशन समोर सर्व फिके

- Advertisement -