‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टने हनीमूनबद्दल केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

Koffee With Karan 7 Trailer Karan Johars First Guests Alia Bhatt And Ranveer Singh Discuss Suhag Raat And More

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण शो अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. चाहत्यांमध्येही हा शो लोकप्रिय आहे. शोमधील सेलिब्रिटींच्या मजेशीर गोष्टी आणि गॉसिप्स चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. या शोचा नवा सातवा सीझन लवकरचं रिलीज होत आहे. करणने नुकताच या सीझनचा पहिला प्रोमो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रिलीज केला आहे. या सीझनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार आहे. रिलीज झालेल्या व्हिडीओमध्ये तिघेही खूप मस्ती करताना दिसत आहे.

यामध्ये रणवीस सिंग आणि आलिया भट्ट दिसत आहे. यावेळी करण त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत प्रश्न विचारताना दिसतोय. यावेळी करणने तिला लग्नानंतरची पहिली रात्र कशी होती? असा प्रश्न विचारला. यावर आलिया असं काही बोलून गेली की ज्यावर अनेकांना हसू आवरने कठीण झाले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय म्हणाली आलिया भट्ट?

आलियाला करण लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत विचारले ज्यावर आलिया म्हणाली की, “लग्नाची पहिली रात्र वगैरे असं काही नसतं. कारण त्याक्षणी आपण खूप दमलेलो असतो. यावेळी काहीच करण्याची हिंमत नसते. आलियाचे हे उत्तर ऐकून रणवीर सिंग आणि करण जौहर दोघांनाही हसू आवरने कठीण झाले. आलिया नेमकं काय बोलून गेली हे काही वेळासाठी कोणालाच समजलं नाही, मात्र तिचं बोलण क्लिक होताच रणवीर, करण पोट धरून हसू लागतात.
त्यामुळे शोचा नवा सीझन रणवीर-आलियाच्या मजेशीर उत्तरांनी गाजणार असल्याचे दिसतेय.

कॉफी विथ करणचा सातवा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर दोन दिवसांनी म्हणजेच 7 जुलैपासून सुरू होईल. हा शो हॉटस्टारवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून रिलीज होईल, कतरिना कैफ-विक्की कौशल देखील या शोमध्ये हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.


सलमान खानची दाक्षिणात्य चित्रपटात एन्ट्री, चिरंजीवीसोबत ‘गॉडफादर’चा पहिला लूक रिलीज