Monday, March 1, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रोमँटिक 'माशुका' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

रोमँटिक ‘माशुका’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

Related Story

- Advertisement -

‘कोळीवूड प्रॉडक्शन’ निर्मित नवे ‘माशुका’ हे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्यातून पुन्हा एकदा अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता रुपेश बने यांची खास जोडी रोमँटिक अंदाजात पाहयाला मिळणार आहे. ‘सुरसपाटा’ चित्रपटात शरयू आणि रुपेश एकत्र झळकले होते. शरयू सध्या झी युवा वरील ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली तर रुपेश बने ‘डान्स+५’ या नामवंत रिअलिटी शोचा विजेता असून त्याने ‘सेंड्रीला’, ‘अतरंगी फंटर’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. आता नव्याने ही जोडी एका रोमँटिक अशा ‘माशुका’ या प्रेमगीतामधून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे.

यू ट्यूबवर मिलियन व्यूजचा इतिहास रचणाऱ्या ‘कोळीवूड प्रॉडक्शन’ अंतर्गत बिग ‘माशुका’ हे गाणे तयार करण्यात आले. संगीत दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध गायक प्रवीण कोळी यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि या गाण्याला संगीत देऊन गाण्याची शान वाढविली आहे. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’, ‘इष्काची नौका’, ‘माझा बाप्पा’ यासारख्या सुप्रसिद्ध आणि हिट झालेल्या गाण्यांना संगीत दिले आहे. गायक पुष्पक परदेशी यांनी या गाण्याला सुमधुर स्वरात संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्यात असणारे रॅप गाणे गायक जे सुबोध आणि रे मार्शल यांनी गायले आहे. संबंध गाण्याच्या संकलनाची जबाबदारी संकलक संदेश कोळी यांनी पेलली. डीओपी म्हणून मितेश तांडेल आणि संदेश कोळी यांनी उत्तम बाजू सांभाळली तर संगीत संयोजक म्हणून तेजस पाडावे आणि योहान शिवशरण यांनी उत्तम साथ दिली. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे ‘इमॅजिका पार्क’ मध्ये चित्रित झाले असून मराठी अल्बम मधील ‘इमॅजिका पार्क’ मध्ये चित्रित होणारे पहिले गाणे आहे. व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित झालेले हे गाणे रसिक प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजन करले यात शंका नाही.


हेही वाचा- ‘हरिओम’ सिनेमाचे दुसरे पोस्टर लाँच

- Advertisement -

 

- Advertisement -