सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी कोकणहार्टेड गर्ल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कोकणहार्टेड गर्ल म्हणजेच इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर अंकिता वालावलकर. जी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकली होती. आपल्या कोकणी भाषेचा गोडवा मिरवत तिने प्रेक्षकांच्या काळजावर स्वतःचे नाव कोरले आहे. बिगबॉसमूळे अंकिता प्रचंड चर्चेत राहिली. यानंतर आता वैयत्तिक आयुष्यामुळे अंकिता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लवकरच कोकणहार्टेड गर्ल तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, त्यांच्या पत्रिकेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Konkan hearted girl Ankita walawalkar wedding date is fixed)
या दिवशी बांधणार लग्नगाठ
अंकिता वालावलकारच्या लग्नाची चर्चा बिग बॉस मराठी सीजन 5पासून सुरू आहे. या पर्वातून बाहेर पडल्यानंतर तिने आपल्या जोडीदाराची अर्थात कुणाल भगतची चाहत्यांना ओळख करून दिली. यानंतर आता लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. मध्यंतरी अंकिताचं लग्न फेब्रुवारीत होणार असे बोलले गेले. काहींनी तर तारखासुद्धा जाहीर केल्या होत्या.
अद्याप अंकिता आणि कुणालने अधिकृतपणे लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. असे असले तरीही सोशल मीडियावर त्यांच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो व्हायरल होतो आहे. ज्यानुसार 16 एप्रिल 2025 रोजी अंकिता आणि कुणालच्या लग्नाचा बार उडणार असे समजते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो निमंत्रण पत्रिका बनवणाऱ्या व्यक्तीच्या चॅटबॉक्सचा आहे.
अंकिता- कुणालची लगीनघाई
आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो आणि तारीखेत किती तथ्य आहे हे अंकिताचं सांगू शकेल. त्यामुळे चाहते तिच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. शिवाय अंकिता आणि कुणालच्या इंस्टाग्राम आयडीवर शेअर होणाऱ्या पोस्ट पाहून समजतंय दोन्ही घरांमध्ये लग्नाची गडबड सुरू झाली आहे.
View this post on Instagram
दोघांच्याही घरी केळवण, देवदर्शन सुरू झालं आहे. वालावलकर आणि भगत कुटुंब एका भव्य सोहळ्याची जंगी तयारी करत आहेत. तर अंकिता आणि कुणाल लवकरच त्यांच्या प्री- वेडींगचे फोटो शेअर करणार आहेत. जे पाहण्यासाठी सगळे झाले उत्सुक आहेत.
हेही पहा –
Upcoming Marathi Movie : ‘गौरीशंकर’ चित्रपटाचा ॲक्शन टीजर रिलीज