टॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2016 मध्ये आलेल्या ‘कबाली’ सिनेमाच्या निर्मात्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजत आहे. दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील नामांकित निर्माता म्हणून के. पी. चौधरीचे नाव घेतले जायचे. मिळालेल्या माहितीनुसार, के. पी. चौधरीने गोव्यात आपले आयुष्य संपवत जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेइंडस्ट्री हादरली आहे. तर के. पी. चौधरीला जवळून ओळखणाऱ्या लोकांसाठी हे वृत्त धक्कादायक ठरले आहे. (KP Choudhary Producer Of Kabali Commits Suicide)
नैराश्यातून केली आत्महत्या
साऊथ सिनेइंडस्ट्रीचा प्रसिद्ध निर्माता के. पी. चौधरी याने मोठे पाऊल उचलत स्वतःचे आयुष्य संपवले आहे. या घटनेने टॉलिवूड सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का लागला आहे. याप्रकरणी गोवा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निर्मात्याच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता के. पी. चौधरी गेल्या बऱ्याच काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो मानसिक तणावात होता. एकूणच परिस्थिती असह्य झाल्याने तणावात असलेल्या के पी चौधरीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
टॉलिवूड सिनेनिर्माता के. पी. चौधरीचे पूर्ण नाव सुंकारा कृष्ण प्रसाद चौधरी असे आहे. त्याने आजवर दाक्षिणात्य सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. त्यामुळे टॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय निर्मात्यांच्या यादीत त्याचे नाव आहे. दरम्यान, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ या सिनेमाची त्याने निर्मिती केली होती. या सिनेमात अभिनेता रजनीकांत मुख्य भूमिकेत होते आणि हा त्यांचा सुपरहिट सिनेमा होता.
गोव्याच्या पबमध्ये सेलिब्रिटींना पुरवायचा ड्रग्ज
निर्माता के पी चौधरीला २०२३ मध्ये एका ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. यानंतर प्रकरणाचा तपास सुरू असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. ज्यामध्ये टॉलिवूडसह इतरही सिनेइंडस्ट्रीतील कलाकार त्याचे स्पेशल क्लाइंट असल्याचे समजले होते. या प्रकरणानंतर के पी आर्थिक अडचणीत सापडला होता. त्याच्यावर कोट्यवधींचे कर्ज झाले होते. त्याच्या कारकिर्दीतील फार कमी सिनेमांना यश मिळाले होते. त्यामुळे वाढते कर्ज आणि करिअरमधले अपयश यामुळे त्याने ड्रग्ज खरेदी- विक्रीचा मार्ग निवडला. पुढे या प्रकरणात त्याला अटक झाली आणि त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. दरम्यान, त्याने अलीकडेच गोव्यात एक ओएचएम पब सुरू केला होता. ज्यामध्ये तो सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत होता, अशी माहितीही उघड झाली आहे.
हेही पहा –
Pushkar Jog : हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय? पुष्करच्या पोस्टने वेधलं लक्ष