घरमनोरंजनकृष्णा अभिषेकने 'द कपिल शर्मा शो' सोडण्यामागचं कारण आलं समोर

कृष्णा अभिषेकने ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागचं कारण आलं समोर

Subscribe

'द कपिल शर्मा' या शोमध्ये कृष्णान साकारत असलेली सपनाच्या भूमिकेने सगळ्यांना खळखळून हसवले. मात्र, इथून पुढे या शोमध्ये सपना ही भूमिका साकारणारे कृष्णा दिसणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा’शो येत्या सप्टेंबर महिन्यापासून हिंदी टेलिव्हिजनवर दाखवला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी या शोमध्ये पुन्हा एकदा हास्याचा डबल डोसपाहायला मिळणार आहे. दरम्यान, अशातच या शोच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. या शोमधील कलाकार कृष्णा अभिषेकने या कार्यक्रमामधून काढता पाय घेतला आहे. दरम्यान, ही बातमी समोर येताच अनेकजण वेगवेगळे तर्क-विर्तक लावू लागले होते. परंतु आता या मागचं खरं कारण समोर आलं आहे.

कृष्णा अभिषेकने सांगितलं शो सोडण्यामागचं खरं कारण
‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये कृष्णान साकारत असलेली सपनाच्या भूमिकेने सगळ्यांना खळखळून हसवले. मात्र, इथून पुढे या शोमध्ये सपना ही भूमिका साकारणारे कृष्णा दिसणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत. या शोमधून बाहेर पडण्यामागचे कारण कृष्णा अभिषेकने सांगितले आहे. खरंतर, या शोच्या करारातील समस्यांमुळे त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाशी संबंधीत एका व्सक्तीने सांगितले की, या शोचे निर्माते आणि कृष्णाने सर्व गोष्टी ठिक करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु आर्थिक व्यवहारामुळे कृष्णाने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

कृष्णाने शो सोडण्यामागे कपिलचा हात
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कृष्णाने हा शो सोडण्यामागे कपिल शर्मा जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आणि कपिलमध्ये काहीही वादविवाद नाहीत. तसेच या शोचे निर्माते वेगळे आहेत. त्यामुळे कपिल आणि कृष्णामध्ये वाद असल्याच्या फक्त अफवा आहेत.


हेही वाचा :‘उनाड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -