घरमनोरंजनचाहत्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी क्रितीने दिली कबुली; म्हणाली...

चाहत्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी क्रितीने दिली कबुली; म्हणाली…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या क्रिती तिच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटांमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 17 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता कार्तिक आर्यन देखील क्रितीसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या हे दोघेही त्यांच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. बुधवारी हे दोघेही एका कॉलेजमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. क्रितीचा त्यावेळचा
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात क्रितीने एका चाहत्याला त्याच्यासोबत चित्रपट पाहायला येईन अशी कबुली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीने हा व्हिडीओ स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती आणि कार्तिक चाहत्यांसोबत संवाद साधत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

यावेळी क्रिती म्हणताना दिसतेय की, “व्हॅलेंटाईन डे प्रेम करण्याचा दिवस आहे मात्र, त्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असण्याची गरज नाही.” यावर कार्तिक म्हणतो की, ज्यांना कोणीच नाहीये त्यांनी काय करायचं?” त्याच्या प्रश्नावर उत्तर देत क्रिती म्हणते की, “पण त्यांना मित्र-मैत्रिणी तर आहेत. त्यांच्याबरोबर ते चित्रपट पाहायला जाऊ शकतात.” क्रितीचं हे वाक्य ऐकूण प्रेक्षकांमधील तिचा एक चाहता तिला म्हणतो की मला मित्र-मैत्रिणीही पण नाहीत. त्यावर क्रिती म्हणते, “मग मी येते तुझ्याबरोबर चित्रपट पाहायला.” यावर सर्वजण मोठ-मोठ्याने हसू लागले.

‘आदिपुरुष’मध्ये देखील दिसणार क्रिती

क्रिती सेनॉन आगामी काळात ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. यात अभिनेता प्रभास देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. शिवाय सैफ अली खान, देवदत्त नागे हे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.


हेही वाचा :

मी राखीशी खूप प्रेमाने…; आदिलच्या गर्लफ्रेंडने सांगितलं सत्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -