घरमनोरंजन'आदिपुरुष'च्या प्रदर्शनापूर्वी काळाराम मंदिरात देसी लूकमध्ये पोहोचली कृती सेनन

‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनापूर्वी काळाराम मंदिरात देसी लूकमध्ये पोहोचली कृती सेनन

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन आणि टॉलिवूड अभिनेता प्रभास सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच काही तासांपूर्वी या चित्रपटाती दुसरं गाणं ‘राम सिया राम’ प्रदर्शित करण्यात आलं. ज्याला काही क्षणातच 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कृती आणि प्रभास चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच कृतीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ती एका मंदिरामध्ये गेलेली दिसत आहे.

या मंदिरात पोहोचली कृती

प्रभास आणि कृती सेननच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट सतत समोर येत आहेत. अशातच कृती सेननचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात कृती सीता गुंफा आणि काळाराम मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये कृतीने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. कृती सेननता हा देसी लूक पाहून चाहते खूप कौतुक करत आहेत. यावेळी गायिका परंपरा आणि गायक सचेत देखील कृती सेननसोबत दिसले.

- Advertisement -

‘आदिपुरुष’ सोशल मीडियावर ट्रेंड

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सतत सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाती आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्रेक्षक गाण्यांचं खूप कौतुक देखील करत आहेत.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘आदिपुरुष’मधील ‘राम सिया राम’ गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -