घरमनोरंजन‘आदिपुरुष’च्या वादावर कृती सेननने दिलं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

‘आदिपुरुष’च्या वादावर कृती सेननने दिलं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Subscribe

प्रभास आणि कृति सेननचा आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी यावेळी अनेकांनी टीझरला ट्रोल केलं होतं. ट्रेलरमध्ये रावण आणि हनुमान यांचे लूक नीट दाखवला नसल्याचा अनेक राजकीय नेत्यांनी तसेच नेटकऱ्यांनी आरोप केला होता. दरम्यान, आता याचं संदर्भात अभिनेत्री कृति सेननने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कृति सेननने ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या तिच्या आगामी ‘भेडिया’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कृतिने ‘आदिपुरुष’च्या टीझरला विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यावेळी ती म्हणाली की, “जे टीझरमध्ये दाखवण्यात आलं ते केवळ मर्यादीत आहे. आत्तापर्यंत फक्त 1 मिनिट 35 सेकंदाचा व्हिडीओ समोर आला आहे. या चित्रपटामध्ये अजून अनेक गोष्टी आहेत. या चित्रपटामध्ये आपला इतिहास आणि हिंदू धर्माला नव्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे”. कृतिच्या या उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

‘आदिपुरूष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

टीझरच्या वादानंतर ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -