प्रभाससोबतच्या नात्यावर कृती सेननने केला खुलासा

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. परंतु चित्रपटाव्यतिरिक्त हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत असल्याच म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या सेटवरील दोघांचे बॉन्डिंग खूप वाढलं आहे. परंतु आता ही वाढती चर्चा पाहून अभिनेत्री कृती सेननने याबाबत खुलासा केला आहे. कृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी टाकली. ज्यातून तिने ही अफवा असल्याचं सांगितलं.

प्रभासच्या नात्याबाबत कृती सेननने केला खुलासा
मागील अनेक दिवसांपासून कृती आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याची बातम्या समोर येत होत्या. ज्यावर आता स्वतः कृतीने उत्तर दिलं आहे. कृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “हे प्रेम नाही आणि कोणताही PR नाही….आमच्या भेडिया प्रमोशनमध्ये झालेली मजा-मस्ती जास्तच व्हायरल झाली आणि त्यामुळे अफवा वाढत गेल्या. याआधी काही पोर्टल आमच्या लग्नाची घोषणा करतील, त्याआधीच मी तुमचा गैरसमज दूर करु इच्छिते. या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत.”

दरम्यान, आता कृतीने प्रभाससोबत कोणतही नातं नसल्याचा खुलासा केल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. खरंतर या अफवांची सुरुवात करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमधून झाली होती. ज्यानंतर एका मुलाखतीत कृती म्हणाली होती की, तिला साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत लग्न करायला आवडेल. दरम्यान, काहींच्या मते हा चित्रपटासाठी केलेला PR आहे. मात्र, या दोन्हीपैकी काहीही नसल्याचं कृतीने स्वतः स्पष्ट केलं आहे.

‘आदिपुरूष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला ईडीचे समन्स